Pune PMPML Employees | पीएमपीएमएलच्या 36 कर्मचार्‍यांवर निलंबनाची तर तिघांवर बडतर्फीची कारवाई, गैरहजर राहणार्‍या 142 जणांना नोटीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMPML Employees | पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह (IAS Sachindra Pratap Singh) यांनी सतत गैरहजर राहणार्‍या तब्बल 36 कर्मचार्‍यांवर निलंबनाची (Suspended) तर तिघांवर बडतर्फीची (Dismissed) कारवाई केली आहे. दरम्यान, दि. 22 जुलै 2023 रोजी गैरहजर राहणार्‍या 142 कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) देण्यात आली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune PMPML Employees)

पीएमपीएमएलच्या एकुण 15 डेपोमध्ये कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांपैकी 36 कर्मचार्‍यांवर त्यांचे मागील रेकॉर्ड खराब असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 30 कंडक्टर आणि 6 ड्रायव्हर्सचा समावेश आहे. बडतर्फ करण्यात आलेल्या तिघांमध्ये 2 ड्रायव्हर आणि वर्कशॉप विभागामध्ये काम करणार्‍या एका कर्मचार्‍याचा समावेश आहे. (Pune PMPML Employees)

कोणतीही पुर्वसुचना न देता दि. 22 जुलै 2023 रोजी गैरहजर राहिलेल्या एकूण 142 कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामध्ये 78 कंडक्टर व 64 ड्रायव्हर्सचा समावेश आहे. प्रवाशांना प्रवासीभिमुख सेवा मिळावी, गैरसोय होऊ नये तसेच जास्तीत जास्त बसेस मार्गावर संचलनात उपलब्ध व्हाव्यात, कामात कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांना शिस्त लागावी व कर्मचार्‍यांच्या गैरहजेरीचे प्रमाण कमी व्हावे म्हणुन ही कारवाई करण्यात आलेली आहे.

प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या शुक्रवारी प्रवासी दिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला असून
यामध्ये प्रवाशी त्यांच्या अडी-अडचणी, तक्रारी, सुचना जवळच्या डेपोमध्ये,
पास केंद्रावर किंवा बसस्थानकांवर नोंदवू शकतात.
सर्व डेपोंसाठी पालक अधिकारी नेमलेले आहेत.
पालक अधिकारी प्रत्येक शनिवारी पहाटे 5 ते सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान
डेपोमध्ये सक्षम पाहणी करून प्रवाशांना चांगली सेवा मिळावी यासाठी कर्मचार्‍यांचे प्रबोधन करतील.
त्यानंतर सकाळी 8 ते सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान गर्दीच्या मार्गावर
स्वतः बसमध्ये प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | पुणे : गुन्हे शाखेकडून कॅम्प परिसरातून मॅफेड्रोन जप्त, एकाला अटक