Pune PMPML Free Bus Pass For Students | पीएमपीएमएल कडून शाळांतील विद्यार्थ्यांकरिता अनुदानित पासेसचे वितरण सुरु

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMPML Free Bus Pass For Students | पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील प्राथमिक, माध्यमिक व खासगी शाळेतील 5 वी ते 10 वी मधील विद्यार्थ्यांना 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता 100 टक्के अनुदानित मोफत बस प्रवास पासचे (Free Bus Pass) वितरण सुरु करण्यात आले आहे. (Pune PMPML Free Bus Pass For Students)

 

तसेच पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील (Private School) इयत्ता 5 वी ते 10 वी चे विद्यार्थ्यांना 75 टक्के सवलतीचे अनुदानित बस प्रवास पासेस वितरणाची योजना सुरु करण्यात आली आहे. पासेससाठी 15 जून पासून सर्व आगारामध्ये व सर्व पासकेंद्रावर अर्ज वितरीत केले जाणार आहेत. तसेच भरून दिलेले अर्ज महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये स्वीकारण्यात येतील.

 

संबंधित शाळा अथवा त्यांचे प्रतिनिधी हे त्यांचे शाळेतील विद्यार्थ्यांकरिताचे अर्ज महामंडळाच्या कोणत्याही आगारांमधून एकत्रित रित्या घेवून जाऊ शकतात. तसेच सदरचे अर्ज भरून एकत्रित रित्या आगारामध्ये जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील. ते पास शाळा प्रमुखांनी त्यांचे शाळेत वितरित करावेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आगारामध्ये येण्याची गरज भासणार नाही.

खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना महामंडळाचे आगारामधून त्यांचा अर्ज व कागदपत्रांची तपासणी झाल्यावर त्यांचे प्रवासाचे अंतरानुसार होणारे एकूण पासचे रकमेचे 25 टक्के रक्कमेनुसारचे चलन तयार करून देणेत येईल ते चलन विद्यार्थ्यांनी पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील बँक ऑफ बडोदा चे (Bank of Baroda) कोणत्याही शाखेमध्ये भरावे.
त्यानंतर अर्जासोबत चलन व आवश्यक कागदपत्रे जोडून जवळच्या आगारामध्ये जामा केल्यावर पास मिळेल.
तरी पिंपरी चिंचवड मनपाचे शाळेतील व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी
या सवलतीच्या पासचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

 

Web Title :  Pune PMPML Free Bus Pass For Students | PMPML starts distribution of subsidized passes to school students

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा