Pune PMPML News | अध्यक्षपदाची सुत्रे घेतल्यानंतर ओमप्रकाश बकोरिया यांनी पीएमपीएमएल कर्मचार्‍यांची दिवाळी गोड केली; बोनस आणि बक्षिसाच्या रक्कमा कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMPML News | पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच ओमप्रकाश बकोरिया (IAS Om Prakash Bakoria) यांनी तब्बल १० कर्मचार्‍यांची दिवाळी गोड केली. पीएमपीएमएलच्या गेल्या काही वर्षांच्या इतिहासात प्रथमच कर्मचार्‍यांना बोनस आणि १९ हजार बक्षिस जाहीर करत संध्याकाळपर्यंत ही रक्कम कर्मचार्‍यांच्या बँक खात्यावर जमा देखिल केली. (Pune PMPML News)

 

पीएमपीएमएलमध्ये सुमारे १० हजार कर्मचारी काम करतात. यामध्ये चालक, वाहकांसोबतच वर्कशॉपमध्ये काम करणारे कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचा समावेश होतो. पीएमपीएमएल ही कंपनी स्थापनेपासून तोट्यातच आहे. हा तोटा वर्षानुवर्षे वाढत असून सुमारे सातशे कोटी रुपयांवर पोहोचला आहे. शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता सुमारे १५०० बसेस रोज रस्त्यावर धावतात. परंतू तोट्याचे कारण सांगून पीएमपीएमएल कर्मचार्‍यांना वेतन आयोग लागू करणे व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर फक्त चर्चाच होत असते. (Pune PMPML News)

 

एवढेच नव्हे तर दरवर्षी दिवाळीमध्ये बोनस साठी देखिल कर्मचारी संघटनांना अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे चकरा माराव्या लागतात. तेंव्हा कुठे दिवाळी सुरूवात झाल्यानंतर बोनस हातात पडतो. यंदा मात्र दिवाळीच्या चार दिवस आगोदरच पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी कर्मचार्‍यांना बोनस आणि १९ हजार रुपये बक्षिस जाहीर केले. विशेष असे संध्याकाळी ही रक्कमही कर्मचार्‍यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आली.
या निर्णयामुळे कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत करताना बकोरिया यांच्यासह दोन्ही महापालिका आयुक्तांचेदेखिल आभार मानले.

पीएमपीएमएल कर्मचार्‍यांना बोनस आणि बक्षिस जाहीर करावे यासाठी आज कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळासोबत पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांची भेट घेतली.
बकोरिया यांनी तातडीने बोनस आणि बक्षिसाची रक्कम जाहीर करून ती कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात जमादेखिल केली.

 

नाना भानगिरे, शहर प्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना (Nana Bhangire, City Chief, Balashaebanchi Shivsena).

 

Web Title :- Pune PMPML News | Omprakash Bakoria sweetened PMPML employees’ Diwali after taking over as president; Credit of bonus and reward amount to employee’s account

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पिस्तूल बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

Sanjay Raut | राज ठाकरेंचे भाजपला दिलेले पत्र हा केवळ स्क्रिप्टचा भाग, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

Mandakini Khadse | जळगाव दूध संघातील अपहार प्रकरणात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल