Pune Police Combing Operation | गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; 2 हजार 544 गुन्हेगारांची झाडाझडती, 757 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Combing Operation | पुणे शहरात वाढत असलेल्या गन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर आणि गणेशोत्सव (Pune Ganeshotsav 2023) व ‘ईद ए मिलाद’च्या (Eid e Milad 2023) निमित्ताने पुणे पोलिसांकडून शहरात कोम्बींग ऑपरेशन राबवण्यात आले. पुणे पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री शहरात विविध ठिकाणी कोबिंग ऑपरेशन करुन गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. पुणे पोलिसांनी हे कोंबींग ऑपरेशन शनिवारी (दि.16) रात्री 10 ते रविवारी (दि.17) मध्यरात्री 2 या वेळेत केले. यामध्ये शहरातील विविध भागात कारवाई करुन 2 हजार 544 गुन्हेगारांची झाडाझडती घेऊन 757 जणांना अटक केली. (Pune Police Combing Operation)

पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करुन गुन्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई करणे, हॉटेल, लॉज, ढाबे, एस.टी व बस स्थानके, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत व्यक्ती, घटना इत्यादींची कसून तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखे कडून कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी शहरातील वेगवगेळ्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन व तपासणी करुन कारवाई केली. (Pune Police Combing Operation)

परिमंडळ 1 मधील 6 पोलीस ठाण्यांतर्गत केलेल्या कारवाईमध्ये एका आरोपीकडून 250 रुपयांचा कोयता जप्त करुन अटक केली आहे. तसेच दारुबंदीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून 3 हजार 010 रुपयांची गावठी हातभट्टी दारु जप्त केली आहे.

परिमंडळ 2 मधील 6 पोलीस ठाण्यांतर्गत केलेली कारवाई

विशेष मोहिमे दरम्यान गुन्ह्यात निष्पन्न मात्र अटक नसलेल्या तीन आरोपींना अटक केली आहे. दोन जणांना अटक करुन त्यांच्याकडून 300 रुपयांचे दोन कोयते जप्त केले आहेत. तर दारुबंदीच्या 7 केस करुन 7 आरोपींकडून 7 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याशिवाय प्रोव्हिबिशन अॅक्ट नुसार एक केस करुन आरोपीकडून 1120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

परिमंडळ 3 मधील 6 पोलीस ठाण्यांतर्गत केलेली कारवाई

गुन्ह्यात निष्पन्न झालेले मात्र अटक नसलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे. याशिवाय दारुबंदीच्या 5 केस करुन 5 आरोपींकडून 4195 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच प्रोव्हिबिशन नुसार एक केस केली असून दोन आरोपींकडून सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याशिवाय कोटपाचे नऊ खटले दाखल केले आहेत.

परिमंडळ 4 मधील 7 पोलीस ठाण्यांतर्गत केलेली कारवाई

विशेष मोहिमे दरम्यान परिमंडळ चारमधील सात पोलीस ठाण्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत गुन्ह्यात निष्पन्न झालेले मात्र अटक नसलेल्या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तडीपारी आदेशाचा भंग करणाऱ्या एका आरोपीवर केस दाखल करण्यात आली आहे. तसेच दारुबंदीच्या 11 केस दाखल करुन 11 आरोपींकडून 9350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रोव्हिबिशन अॅक्ट नुसार पाच केस करुन पाच आरोपींकडून 7755 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याशिवाय ध्वनी प्रदुषणाबाबत तीन केस केल्या आहेत.

परिमंडळ 5 मधील 7 पोलीस ठाण्यांतर्गत केलेली कारवाई

परिमंडळ पाच मध्ये राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत चार केसेस करुन चार आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून 400 रुपयांचे तीन कोयते आणि 550 रुपयांचा एक सुरा जप्त केला आहे. तसेच दारुबंदीच्या 14 केस दाखल करुन आरोपींकडून 14 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हे शाखेने केलेली कारवाई

गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने पर्वती पोलीस ठाण्यात आयपीसी 324, 352, 323, 504, 34 नुसार दाखल असलेल्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक एकने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अक्षय इरेश शिंदे (वय-22 रा. हांडेवाडी रोड) याच्यावर एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन गांजा, मोबाईल, दुचाकी असा एकूण 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच 3 आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून दीड हजार रुपयांचे दोन कोयते, 400 रुपयांचा सुरा जप्त केला आहे. दारुबंदीच्या 9 केसे करुन आरोपींकडून 27 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विशेष मोहिमे दरम्यान प्रोव्हिबीशन अॅक्ट नुसार गुन्हे शाखेने 9 तर पोलीस स्टेशनने 38 केसेस दाखल करुन एकूण 64 हजार 455 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जुगार अॅक्ट अंतर्गत पोलीस स्टेशनने 7 केसेस दाखल करुन 8 आरोपींना अटक करुन जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

पुणे पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये 550 हॉटेल, ढाबे व लॉज तपासण्यात आले. तसेच 157 एस टी स्टँड, रेल्वे स्थानक, निर्जन ठिकाणे चेक करण्यात आली. वाहतूक पोलिसांकडून 1007 संशयित वाहन चालकांना चेक करुन 261 जणांकडून 2 लाख 25 हजार 800 रुपयांचा दंड वसुल केला आहे. तर पोलीस स्टेशनकडून 965 वाहन चालकांना चेक करुन 257 जणाकडून 2 लाख 24 हजार 200 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशान्वये सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill), पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ – 4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate), पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Traffic Vijaykumar Magar) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी,अंमलदार यांच्या पथकाने संयुक्तपणे हे कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | कोंढवा-उंड्री परिसरातील ओंकार कापरेसह 10 जणांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून आतापर्यंत 62 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA