Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेच्या खंडणी विरोध पथक-2 कडून खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयातील आरोपींना आश्रय देणार्‍या तसेच मदत करणार्‍यांना अटक

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक-2 ने Anti Extortion Cell Pune (AEC Pune) लष्कर पोलिस ठाण्याच्या (Lashkar Police Station) हद्दीत घडलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयातील आरोपींना आश्रय देणार्‍या तसेच त्यांना पलायन करण्यासाठी व लपून राहण्यासाठी मदत करणार्‍या दोघांना अटक केली आहे. (Pune Police Crime Branch News)

 

शुभम प्रितम सारवान Shubham Pritam Sarwan (27, रा. रूम नं. 13, पिसीबी क्वॉटर्स, धोबी घाट, शंकरशेठ रोड, कॅम्प, पुणे) आणि अजिम सलीम शेख Azim Salim Shaikh (29, रा. कॉलनी नं. 10, कासेवाडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 20 जुन 2023 रोजी लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अ‍ॅलेक्स गवळी आणि त्याच्या 10 ते 15 साथीदारांनी आझम कॅम्पस (Azam Campus Pune) गेटकडून पुजा कॉलेज गेट नं. 2 रोडवर अनिरूध्द अनिल जगताप (25, रा. न्यू मोदीखाना, कॅम्प) यांचा चुलत भाऊ पंकज जगताप आणि त्याचा मित्र कौतुभ यांच्यावर खुनी हल्ला (Attempt To Kill) केला होता. (Pune Police Crime Branch News)

 

खंडणी विरोधी पथक-1 चे पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार हे अ‍ॅलेक्स गवळी आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत होते. त्यावेळी शुभम सारवान आणि अजिम शेख हे आरोपींना आश्रय देवुन त्यांना पलायन करण्यासाठी तसेच लपुन राहण्यासाठी मदत करत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी शुभम सारवान आणि अजिम शेख यांना अटक केली आहे.

 

आगामी काळात देखील पुणे शहर पोलिसांकडून फरारी आरोपींना आश्रय देणार्‍या तसेच त्यांना
वेगवेगळया प्रकारे मदत करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर (Sr PI Pratap Mankar), लष्कर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण (Sr PI Shashikant Chavan), सहाय्यक पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajgane), पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), मोहनदान जाधव (PSI Mohandas Jadhav), पोलिस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शंकर संपते, संग्राम शिनगारे, सुरेंद्र जगदाळे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेतन आपटे, अनिल मेंगडे, ईश्वर आंधळे, राहुल उत्तरकर, पवन भोसले, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, किशोर बर्गे आणि लष्कर पोलिस स्टेशन यांनी संयुक्तरित्या केलेली आहे.

 

 

Web Title : Pune Police Crime Branch News | Anti-Extortion Squad-2 of the Crime Branch arrested those who
sheltered and assisted the accused in the crime of attempted murder

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा