Pune Police Crime Branch News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून रात्रीच्या वेळी घातक हत्यारांचा धाक दाखवुन लुटणार्‍यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील युनिट-4 च्या पथकाने रात्रीच्या वेळी घातक हत्यारांचा धाक दाखवुन लुटणार्‍यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून जबरी चोरीचे (Robbery In Pune) दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. (Pune Police Crime Branch News )

 

साहिल उर्फ मोबासाई समीर शेख Sahil alias Mobasai Sameer Shaikh (21, रा. यशवंतनगर, मच्छि मार्केट मागे, शेलार चाळ, येरवडा, पुणे) याला अटक करण्यात आली आहे तर त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. (Pune Police Crime Branch News )

 

युनिट-4 चे पथक विमानतळ पोलिस ठाण्यात (Viman Nagar Police Station) दाखल असलेल्या एका जबरी चोरीचा तपास करीत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार विनोद महाजन आणि पोलिस अंमलदार नागेशसिंग कुंवर यांना विमाननगर परिसरातील सिम्बोयसिस कॉलेज (Symbiosis College Viman Nagar) जवळ आणि येरवडयातील कल्याणीनगर (Kalyani Nagar, Yerwada) परिसरात रात्रीच्या वेळी धारदार हत्यारांचा धाक दाखवुन लुटणारे आरोपी हे संगमवाडी (Sangamwadi) येथील पार्किंग नं. 3 येथे बसले असल्याची माहिती मिळाली होती. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचुन साहिल शेखला अटक केली आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतले.

 

त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा फरार साथीदार कैफ शेख
आणि जिवय उर्फ डुड राठोड याच्या मदतीने विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणि
येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून पालघन आणि 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर
(ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने (Sr PI Ganesh Mane), पोलिस उपनिरीक्षक जयदीप पाटील (PSI Jaydeep Patil), पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पवार (PSI Mahendra Pawar), पोलिस अंमलदार संजय आढारी, प्रविण भालचिम, विनोद महाजन, नागेशसिंग कुंवर आणि स्वप्निल कांबळे यांच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे.

 

 

Web Title :Pune Police Crime Branch News | Crime Branch of Pune Police arrested the robbers viman nagar police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा