Sara Ali Khan | अभिनेत्री सारा अली खानने केली मुंबईमध्ये स्ट्रीट शॉपिंग

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही तिच्या अदांमुळे व अभिनयामुळे खूप प्रसिद्ध झाली आहे. सारा ही नेहमी पापाराझींसोबत व फॅन्ससोबत नम्रपणे वागताना दिसते. सर्वांना हसून नमस्ते बोलण्याची साराची सवय नेटकऱ्यांना खूप आवडते. सारा अली खानला (Sara Ali Khan) मुंबईमध्ये सामान्यांप्रमाणे स्ट्रीट शॉपिंग करताना स्पॉट करण्यात आले. तिचे हे साधे राहणीमान नेटकऱ्यांना खूप आवडले आहे. अभिनेत्री सारा अली खानची स्ट्रीट शॉपिंगचा (Sara Ali Khan Street Shopping) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

 

अभिनेत्री सारा अली खान ही सेलिब्रिटी असून अनेकदा सामान्यांप्रमाणे फिरताना दिसते.
नुकतीच सारा बांद्रा येथील लिंक रोड लोकल बाजारामध्ये फिरताना दिसली.
(Sara On Bandra Link Road) यावेळी साराने शॉर्ट पॅट व टी शर्ट परिधान केला होता.
व छोटीशी स्लिंग बॅग कॅरी केली होती. अभिनेत्री सारा अली खान कॅज्युयली दुकानांमध्ये जाताना दिसली.
तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांना पसंत पडत आहे.

 

 

अभिनेत्री सारा अली खानने अभिनयाच्या बळावर बॉलीवुडमध्ये (Bollywood News) वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2018 साली तिने अभिनेता सुशांत सिंग रजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या सोबत ‘केदारनाथ’ चित्रपटामध्ये (Kedarnath Movie) स्क्रीन शेअर करत दमदार पदार्पण केले. त्यानंतर ती सिंबा (Simba), लव आज कल (Love Aaj Kal), अतरंगी रे (Atrangi Re) या सारख्या सिनेमांमध्ये झळकली. सारा अली खानचा नुकताच ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यामधील अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) व अभिनेत्री सारा अली खान यांची जोडी प्रेक्षकांना आवडली. सारा अली खानचा मेट्रो इन दिनों (Metro In Dino) हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

Web Title : Sara Ali Khan | sara ali khan spotted street shopping in bandra video goes viral on social media watch video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून रात्रीच्या वेळी घातक हत्यारांचा धाक दाखवुन लुटणार्‍यांना अटक

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरचे नवे हॉट फोटोशूट; फ्लोरल बॉडीकॉन ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष