Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडून मंडई परिसरातून अफीम, गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरेाधी पथक-2 ने Anti Narcotics Cell Pune (ANC Pune) महात्मा फुले मंडई Mahathma Phule Mandai (Mandai Pune) परिसरातून अफीम (Afim) आणि गांजा (Ganja) जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. (Pune Police Crime Branch News )

जगदीश कालुजी जाट Jagdish Kaluji Jat (27, सध्या रा. पुणे, मुळ रा. तहसील गंगरार, जि. चितोड, राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अंमली पदार्थ विरोधी पथक-2 चे पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार हे विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या (Vishrambaug Police Station) हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार योगेश मांढरे (Police Yogesh Mandhare) यांना बातमीदारामार्फत एकजण मंडई परिसरात अफीम आणि गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचुन आरोपीला अटक केली. त्याच्या ताब्यातुन 92 हजार 505 रूपये किंमतीचा 6 किलो 167 ग्रॅम अफीमच्या बोंडयाचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ आणि 26 हजार रूपये किंमतीचा 1 किलो 300 ग्रॅम गांजा आणि 10 हजार रूपयाचा मोबाईल असा एकुण 1 लाख 28 हजार 505 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Police Crime Branch News)

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल थोपटे (PI Sunil Thopte), पोलिस उपनिरीक्षक शुभांगी नरके (PSI Shubhangi Narke), पोलिस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, युवराज कांबळे, संतोष देशपांडे, संदिप जाधव आणि दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title :  Pune Police Crime Branch News | Anti-Narcotics Cell-2 of Crime Branch seized opium, ganja from Mandai area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Crime | पुणे जिल्ह्यात खळबळ ! सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय माजी नगरसेवकाची जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने हत्या

Pune Police News | फरासखाना पोलिसांकडून मोक्कातील फरार आरोपीला अटक; पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्याकडून पोलिस अंमलदाराचा सत्कार

Speaker Rahul Narvekar | 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाला लागला वेग; विधानसभा अध्यक्ष आजच नोटीस देण्याची शक्यता

NCP Chief Sharad Pawar | “राष्ट्रवादीत उभी फूट म्हणजे शरद पवारांनी ठरवून केलेला कार्यक्रम”; पवारांच्या जुन्या सहकाऱ्याचा दावा

Pune Crime News | पुणे : ट्रेकला गेलेला तरुण पाण्यात गेला वाहून; मावळमधील कुंडमळ्यातील धक्कादायक घटना

Dr. Pradeep Kurulkar | प्रदीप कुरुलकरांची पाकिस्तानी गुप्तहेराबरोबर क्षेपणास्त्रांविषयी चर्चा; एटीएसच्या दोषारोपपत्रात धक्कादायक उल्लेख

Pune Crime News | पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 26 वी MPDA ची कारवाई ! विमाननगर परिसरात दहशत माजविणारा गुंड स्थानबद्ध