Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : कोंढव्यातील हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई, 4 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | कोंढवा हद्दीतील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर (Hookah Parlor) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch News) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell) छापा टाकून 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि.10) कोंढवा हद्दीत इडीपी फॅमिली रेस्टॉरंट (EDP Family Restaurant), क्लाऊड 9 एरीया (Cloud 9 Area) येथे करण्यात आली.

एन.आय.बि.एम. कोंढवा हद्दीतील व्हिस्टा सोसायटीजवळ असलेल्या हॉटेलमध्ये अवैध हुक्का बार सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. बुधवारी पोलिसांनी पाळत ठेवून हॉटेलमध्ये छापा टाकला. त्यावेळी काहीजण धुम्रपान करताना आढळून आले. पोलिसांनी 45 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन हॉटेल मालक, मॅनेजर, हुक्का बनवणारे व सर्व्ह करणारा वेटर असे एकूण चार जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior PI Bharat Jadhav), सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे (API Aniket Pote) पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, तुषार भिवरकर, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Police Crime Branch News : Police action on hookah parlor in Kondhwa, FIR against 4 people

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | ‘…तरीही निर्लज्जासारखं हसतायत’, सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकिलांची संतप्त प्रतिक्रिया

Pune News | एरंडवणे-कर्वेनगर भागातील प्रलंबीत कामे लवकर पूर्ण करा, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांची मागणी

Ajit Pawar | कोर्टाच्या निकालावर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया; म्हणाले – ‘मी दिल्लीला…’

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 30 हजाराच्या लाच प्रकरणी सरपंच, उप सरपंच अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Maharashtra Political Crisis | भरत गोगावलेंची प्रतोतपदी पुन्हा नियुक्ती होणार?, शिंदे गटाचे खासदार म्हणाले…