Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून पिस्तुल, धारदार सुरा बाळगणार्‍यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | देशी बनावटीचे पिस्टल आणि धारदार सुरा बाळगणार्‍यांना (Pistol Seized) पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेच्या युनिट-5 ने अटक केली आहे. अटक केलेल्या दोघांकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, एक राऊंड तसेच एक स्टिलचा धारदार सुरा जप्त करण्यात आला आहे. (Pune Police Crime Branch News)

 

मोहन मारूती गोरे Mohan Maruti Gore (19, रा. खोरी वस्ती, गणपती मंदिराजवळ, साईनगर, सिंहगड रोड, हिंगणे खुर्द) आणि विशाल किशोर पुरबिया Vishal Kishor Purbia (22, रा. जुनी म्हाडा कॉलनी, बिल्डींग नंबर 16, रूम नं. 10, वैदवाडी, हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेच्या युनिट-5 चे पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार हे शेवाळेवाडी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना एकजण अग्नीशस्त्रासह वावरत असून तो गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे समजले. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचुन मोहन गोरेला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक राऊंट जप्त करण्यात आला. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरूध्द सन 2022 मध्ये खुनाच्या प्रयत्नासारखे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

आरोपी विशाल पुरबिया हा देखील स्वतःजवळ स्टिलचा धारदार सुरा बेकायदेशीररित्या घेवून फिरत होता. पोलिसांनी त्याला देखील अटक केली आहे. त्याच्याकडील सुरा जप्त करण्यात आला आहे. याबाबत हडपसर पोलिस स्टेशनमध्ये (Hadapsar Police Station) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-5 चे पोलिस निरीक्षक उल्हास कदम (Sr PI Ulhas Kadam),
सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर (API Krishna Babar), पोलिस अंमलदार रमेश साबळे, प्रताप गायकवाड,
प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, अकबर शेख आणि राहुल ढमढेरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :  Pune Police Crime Branch News | Pune Police Crime Branch Arrest Mohan Maruti Gore And
Vishal Kishor Purbia In Pistol Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | Gang spreads terror in Taljai area of Sahakar Nagar police station;
Vandalise 26 vehicles; Police apprehend notorious criminal Papulya Waghmare

ACB Trap News | Police constable walks into ACB net while accepting Rs 12,000 bribe

Pune PMC Property Tax | Property owners to get 5-10% rebate on general tax; PMC announces lottery scheme