Pune Police Inspector Transfer | औंध: दरोड्याच्या उद्देशाने केलेल्या हल्ल्यात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Inspector Transfer | औंध भागातील परिहार चौक (Parihar Chowk Aundh) परिसरातून पहाटे फिरायला निघालेल्या एका 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर चोरट्यांनी (Robbery Case) गुरुवारी (दि. 13) हल्ला केला होता. यामध्ये ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे (Chaturshringi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय सुधीर कुलकर्णी (Sr PI Ajay Kulkarni) यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. बदलीचे आदेश अपर पोलीस आयुक्त, प्रशासन अरविंद चावरिया यांनी शुक्रवार (दि.14) काढले आहेत. दरम्यान, अजय कुलकर्णी यांनी बदलीसाठी अर्ज केला होता. याच दरम्यान औंध मध्ये ही घटना घडली. (Pune Police Inspector Transfer)

समीर राय चौधरी (वय 77) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. चौधरी यांच्यावर चोरट्यांनी गुरुवारी हल्ला केला होता. चौधरी यांच्या डोक्यात चोरट्यांनी गज मारला. मेंदू-मृत झालेल्या चौधरी यांचा शुक्रवारी सायंकाळी औंधमधील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. चोरट्यांनी चौधरी यांच्यासह तिघांवर हल्ला केला होता.

याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी चोरट्यासह त्याच्याबरोबर असलेल्या तीन
अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी
यांची नियंत्रण कक्षात बदली (Pune Polic Control Room) करण्यात आली आहे.

दरम्यान, पुढील आदेश होईपर्यंत वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Sr PI Shailesh Sankhe)
हे चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्ह्णून तात्पुरत्या स्वरूपात कामकाज पाहणार आहेत.
असे आदेश देण्यात आले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dattatray Bharne | आमदार दत्तात्रय भरणे यांना सायबर चोरट्यांनी बनवलं ‘मामा’,
अपघाताची बतावणी करुन घातला गंडा

Sinhagad Road Pune Crime News | पुणे : वाहन चोरी करणाऱ्या दाम्पत्याला सिंहगड पोलिसांकडून अटक,
8 चारचाकी व 9 दुचाकी जप्त (Video)