Pune Police Marathon | ‘दि अ‍ॅडिक्शन अँड वुमन सेफ्टी’ जनजागृती करण्यासाठी आयोजित मॅरेथॉनमध्ये 700 स्पर्धक धावणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Marathon | शासनाच्या उपक्रमांतर्गत अंमली पदार्थ डि-एडिक्शन (Drug De-addiction) व वुमन सेफ्टी (Women Safety) च्या अनुषंगाने समाजात जनजागृती करण्यासाठी पुणे पोलिसांकडून रविवारी (दि.6) मॅरेथॉनचे (Pune Police Marathon) आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 650 ते 700 स्पर्धक सहभागी होणार आहेत.

पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांनी मॅरेथॉनचे आयोजन (Pune Police Marathon) करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर पोलीस (Pune City Police) दलाच्या वतीने पुणे पोलीस व नागरिकांकरीता ब्ल्यू ब्रिगेड रनिंग क्लब, पुणे (Blue Brigade Running Club) यांच्याकडून 6 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 5.30 वा ‘दि अॅडिक्शन अँड वुमन सेफ्टी’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पोलीस व नागरीक स्पर्धकांना नाव नोंदणी
करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार नाव नोंदणी केलेल्या स्पर्धकांना शनिवारी
(दि.5) सकाळी 11 ते 5 या वेळेत टी-शर्ट व बिब नंबर दिले जाणार आहेत. हॉटेल वेस्टीन (लॉबी) कोरेगाव पार्क एबीसी रोड, मुंढवा येथून स्पर्धकांनी बिब नंबर व टी-शर्ट घेऊन जावे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

10 किलोमीटरची ही मॅरेथॉन स्पर्धा सकाळी साडे पाच वाजता वेस्टीन हॉटेल,
एबीसी रोड कोरेगाव पार्क (Westin Hotel, Koregaon Park)
येथून सुरु होऊन हडपसर मगरपट्टा सिटी (Hadapsar Magarpatta City)
येथून पुन्हा वेस्टील हॉटेल येथे येऊन समाप्त होणार आहे. सहभागी नागरीकांनी
वेळेपूर्वी हॉटेल वेस्टीन येथे हजर रहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Health Tips | पावसाळ्यात हंगामी आजारांपासून रहा सावध, अशी घ्या आरोग्याची काळजी

Maharashtra Assembly Session 2023 | पावसाळी अधिवेशन जनतेच्या तोंडाला पाने पुसणारेच ठरले; काँग्रेसचा घणाघात