Pune Police MCOCA Action | लोणी काळभोर परिसरात दहशत माजवणाऱ्या अभिजीत आहेरकर व त्याच्या 4 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 83 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | लोणी काळभोर परिसरात कोयत्याने (Koyta) मारहाण (Beating) करुन दहशत पसरवणाऱ्या अभिजीत आहेरकर व त्याच्या इतर 4 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पदभार स्वीकारल्यापासून 83 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का (Pune Police MCOCA Action) कायद्यान्वये कारवाई केली आहे.

गाडी निट बघून चालवता येत नाही का असे बोलल्याच्या कारणावरुन चार ते पाज जणांनी एका तरुणावर कोयता व रॉडने वार केले. तसेच त्याच्या मित्राच्या हातावर वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर हातातील कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. हा प्रकार 25 सप्टेंबर रोजी रात्री लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीत घडला. याप्रकरणी आरोपींवर आयपीसी 307, 326, 504, 506, 143, 144, 147, 148, 149 आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दाखल गुन्ह्याचा तपास करुन टोळी प्रमुख अभिजीत अभिमन्यु आहेरकर Abhijeet Abhimanyu Harkar (वय-22 रा. लोणी काळभोर), अभिषेक दत्तात्रय रामपुरे Abhishek Dattatraya Rampure (वय-20 रा. आल्हाट चाळ, कदमवाक वस्ती), प्रथमेश गणेश आयरे Prathamesh Ganesh Ayre (वय-19 रा. सिद्राममळा, लोणी काळभोर) यांना अटक केली आहे. तर प्रणव भारत शिरसाठ, गौरव गोपीचंद बडदे हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आरोपी अभिजीत आहेरकर याने गुन्हेगारांची टोळी तयार केली. टोळीचे वर्चस्व तसेच परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी लोणी काळभोर व परिसरातील गावामध्ये पिस्टल व शस्त्राचा वापर दहशत निर्माण केली. आरोपी अभिजीत आहेरकर याच्यावर 2019 पासून 6 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये पिस्टल बाळगणे, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला करण्यासाठी हत्यार बाळगणे, गंभीर दुखापत करणे, गर्दी मारामारी, मालमत्तेचं नुकसान करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत. (Pune Police MCOCA Action)

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण (Sr PI Shashikant Chavan)
यांनी परिमंडळ- 5 पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh)
यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला होता.
या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख,
सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण,
तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे,
पोलीस उप निरीक्षक हनुमंत तरटे, तपास पथकाचे पोलीस अंमलदार तेज भोसले, संदीप घनवटे,
आशितोष गवळी, मल्हारी ढमढेरे, मंगेश नाना पुरे, रोहिणी जगताप यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यातील भाजपाचे माजी नगरसेवक उदय जोशी यांना ५ कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा, जामीन मंजूर