Pune Crime News | पुणे : भांडणाच्या रागातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार, सराईत गुन्हेगारासह दोघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यात कोयता गँगची (Koyta Gang) दहशत ही दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंढवा परिसरात सराईत गुन्हेगाराने दुपारी झालेल्या भांडणाच्या रागातून एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात (Pune Police) सराईत गन्हेगारासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.20) रात्री दहाच्या सुमारास केशवनगर येथील रेणुकामाता मंदिरासमोर घडली. (Pune Crime News)

या घटनेत ओंकार विजय गायकवाड (वय-17 रा. क्रांती चौक, मुंढवा) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याने मंगळवारी (दि.21) मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन योगेश डिरे, रज्जत चौधरी (दोघे रा. केशवनगर, मुंढवा) यांच्यावर आयपीसी 307, 323, 504 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश डिरे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार गायकवाड याला त्याच्या मामाच्या घरी जेवणाचा डबा आण्यासाठी जायचे होते. यासाठी ओंकार याने त्याचा मित्र इमाम शेख याला दुचाकी मागितली. त्यावेळी शेख म्हणाला, माझी केशवनगर येथील योगेश डिरे याच्यासोबत दुपारी भांडण झाले आहे. तु गाडी घेऊन गेला तर तो माझी गाडी ओळखून तुझ्यासोबत भांडण करेल. तरी देखील ओंकार आणि त्याचा मित्र निलेश हे इमाम शेख याची दुचाकी घेऊन मामाच्या घरी जेवणाचा डबा आणण्यासाठी गेले.

रेणुकामाता मंदिरासमोर आरोपी योगेश डिरे आणि रज्जत चौधरी यांनी फिर्य़ादी याची दुचाकी आडवली.
दुपारच्या भांडणात तु होता ना, तुझी विकेटच टाकतो असे म्हणत योगेश डिरे याने कमरेला लावलेला कोयता बाहेर काढला.
त्याने ओंकारच्या डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला.
तसेच दगडाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक करपे (API Karpe) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक