Pune Police MCOCA Action | वडगाव शेरी गावठाण परिसरात दहशत माजवणाऱ्या अतिश डिंगरे टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 106 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | ‘आम्ही वडगाव शेरीचे भाई आहोत’ असे म्हणत रोडवर पार्क केलेल्या वाहनांची धारदार हत्यारे व लोखंडी रॉडने तोडफोड करून वडगाव शेरी गावठाण परिसरात दहशत माजवणाऱ्या अतिश डिंगरे व त्याच्या इतर 5 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 106 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

याप्रकरणी टोळी प्रमुख अतिश उमेश डिंगरे (वय-23 रा. दिपक चौपाटी, ता. वणी, यवतमाळ), स्वप्नील गोवर्धन ओव्हाळ (वय-22 डुक्कर गल्ली, वडगाव शेरी), कुणाल महेंद्र परीहार (वय-20 रा. गणेश नगर, वडगाव शेरी), आकाश हरीश्चंद्र पायगुडे (वय-22 रा. कलवड वस्ती, लोहगाव), अजय राम घनघाव (वय-23 रा. धानोरी, विश्रांतवाडी), आदित्य संदेश कांबळे (वय-21 रा. वडगाव शेरी, पुणे) यांच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात आयपीसी 308, 143, 147, 148, 149, 427 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार 13 नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा एक ते दोन च्या दरम्यान सत्यम सेरेनिटी सोसायटी माळवाडी तसेच वडगाव शेरी गावठाण परिसरात घडला होता.

चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा (Pune Police MCOCA Action) अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil) करीत आहेत.

ही कामगिरी ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borat), सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Sr PI Rajendra Landge), पोलीस निरीक्षक गुन्हे मनिषा पाटील (PI Manisha Patil), पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे (PSI Dilip Palve) पोलीस अंमलदार राजेश नवले, रामचंद्र गुरव, पंकज मुसळे, नाना पतुरे, गणेश आव्हाळे, अनुप सांगळे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Thackeray Group | कलंकित, ‘मिरची’ छाप व्यापाऱ्यांना उमेदवारी न देण्याचे फर्मान सुटले तर शिंदे, अजित पवार गटातील…, शिवसेनेचा घणाघात

Pune Pimpri Chinchwad Crime News | भरधाव दुचाकीची कारला धडक, एकाचा मृत्यू; बाजीराव रोडवरील घटना

Skin Hydration | खाज येण्यापासून ते बारीक रेषांपर्यंत, त्वचेमध्ये पाणी कमी झाल्यास दिसतात ‘हे’ 5 चिन्हे..

Pune Pimpri Chinchwad Crime News | मेट्रोच्या सिक्युरिटी सुपरवायझरला मारहाण करुन चारचाकी गाडीची तोडफोड, नदीपात्रातील घटना

सिनेस्टाईल पाठलाग, अल्पवयीन मुलीचा भररस्त्यात रोड रोमियोंकडून विनयभंग; वारजे माळवाडी परिसरातील घटना

पुण्यात दोन अल्पवयीन मुलींचा 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग

अंगावरील कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Ajit Pawar | आता मुलाच्या नावापुढे लागणार आईचे नाव…नंतर वडिलांचे, चौथ्या महिला धोरणाला मंजुरी, अजित पवारांची माहिती