Pune Pimpri Chinchwad Crime News | भरधाव दुचाकीची कारला धडक, एकाचा मृत्यू; बाजीराव रोडवरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | भरधाव वेगात दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीची धडक कारला बसली. यामध्ये दुचाकीस्वार तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला आहे. हा अपघात (Pune Accident News) पुण्यातील बाजीराव रोडवरील (Bajirao Road) महाराणा प्रताप उद्यानासमोर रविवारी (दि.24) रात्री दोनच्या सुमारास झाला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

गुंजन दत्तात्रय सोनवणे (वय- 25 रा. कोथरुड, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर शुभम गवांदे हा जखमी झाला आहे. याबाबत दिलीप मुकेश पुरोहीत (वय-21 रा. निगडी प्राधिकरण, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन मयत गुंजन सोनवणे याच्यावर आयपीसी 304अ, 279, 337, 427 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत (Motor Vehicle Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप पुरोहित हे त्यांच्या चारचाकी कार मधून बाजीराव रोडने जात होते. त्यावेळी दुचाकीस्वार सोनवणे व त्याचा मित्र गवांदे भरधाव वेगात निघाले होते. महाराणा प्रताप उद्यानासमोर (Maharana Pratap Park) भरधाव वेगातील दुचाकी कारच्या उजव्या बाजूने जोरात धडकली. या अपघातात सोनवणे गंभीर जखमी झाला. सोनवणे व त्याच्या मित्राला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच सोनवणे याचा मृत्यू झाला होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Thackeray Group | कलंकित, ‘मिरची’ छाप व्यापाऱ्यांना उमेदवारी न देण्याचे फर्मान सुटले तर शिंदे, अजित पवार गटातील…, शिवसेनेचा घणाघात

Pune Pimpri Chinchwad Crime News | मेट्रोच्या सिक्युरिटी सुपरवायझरला मारहाण करुन चारचाकी गाडीची तोडफोड, नदीपात्रातील घटना

सिनेस्टाईल पाठलाग, अल्पवयीन मुलीचा भररस्त्यात रोड रोमियोंकडून विनयभंग; वारजे माळवाडी परिसरातील घटना

पुण्यात दोन अल्पवयीन मुलींचा 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग

अंगावरील कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Ajit Pawar | आता मुलाच्या नावापुढे लागणार आईचे नाव…नंतर वडिलांचे, चौथ्या महिला धोरणाला मंजुरी, अजित पवारांची माहिती