Pune Police MCOCA Action | कोंढवा परिसरातील अक्षय लोणारे टोळीतील 3 जणांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 56 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | पार्टी करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) करणाऱ्या अक्षय अशोक लोणारे व त्याच्या 2 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 56 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर (MCOCA On Organised Gangs In Pune) मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

पार्टीसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी अक्षय लोणारे व त्याच्या इतर दोन साथीदारांनी एका तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. हा प्रकार 9 जून 2023 रोजी कोंढवा खुर्द येथील बधे चौकात घडला होता. याबाबत तरुणाच्या घरच्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी टोळी प्रमुख अक्षय अशोक लोणारे (वय-28 रा. भिमनगर कोंढवा खुर्द), अनिकेत राजु देशपांडे (वय-23 रा. कोंढवा), दिनेश रामदास घाडगे (वय-22 रा. पारगे चौक, कोंढवा बु.) यांच्यावर आयपीसी 307, 323, 504, 34 सह महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे.

टोळी प्रमुख अक्षय लोणारे याने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करुन कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 गुन्हे (Pune Crime News) केले आहेत. या टोळीने स्वत:च्या व टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्यासाठी खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), बलात्कार (Rape), जबरी चोरी, घरफोडी (Burglary), शस्त्र बाळगणे, लुटमार, दमदाटी यासारखे गुन्हे केले आहेत. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव (Pune Police MCOCA Action) करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior PI Santosh Sonawane) यांनी परिमंडळ-5 पोलिस आयुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे (ACP Shahuraje Salve) करीत आहेत.

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 56 संघटित गुन्हेगारी टोळयांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे.
आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख,
सहायक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे,
पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले (PI Sandeep Bhosle), संजय मोगले (Sanjay Mogle),
पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले (PSI Sadhan Machale) पोलीस अंमलदार जगदीश पाटील, राजेंद्र ननावरे,
नितीन चव्हाण, हनुमंत रुपनवर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | ‘भाजपने मराठा समाजाची माफी मागावी’, सुप्रिया सुळेंच्या मागणीवर चित्रा वाघ यांचा पलटवार, म्हणाल्या-‘तुम्ही खरंच प्रयत्न केले असते तर…’

Jalna Lathi Charge | जालना लाठीचार्जवर राज ठाकरे म्हणाले ‘मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी…’

Retired ACP Anis Kazi Passed Away | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अनिस काझी यांचे निधन

Thane Crime News | माजी महापौराच्या भावाने गोळी झाडून पत्नीचा केला खून; त्यानंतर भावाचाही मृत्यु

Diabetes and Infertility | डायबिटीजमध्ये प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम, जाणून घ्या पुरुषांनी कोणती काळजी घ्या