Pune Pimpri Chinchwad Crime News | डाव्या बाजूने ओव्हरटेक करणार्‍या दुचाकीस्वाराने बसचालकाला केली मारहाण

पुणे : Pune Pimpri Chinchwad Crime News | चुकीच्या पद्धतीने डाव्या बाजूने बसला ओव्हरटेक (Overtake) करत असताना बस घासल्याच्या कारणावरुन दुचाकीस्वाराने पीएमपी बस चालक (PMP Bus Driver) व वाहकांना शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत बस वाहक गोविंद त्रिंबक मिसाळ (वय ४०, रा. वाघोली) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०/२४) दिली आहे. ही घटना लोहगावमधील धानोरी जकातनाका येथे शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजता घडली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पीएमपी बसवाहक आहेत. बस पुणे स्टेशनकडे घेऊन जात असताना एक दुचाकीस्वार डाव्या बाजूने बसला ओव्हरटेक करुन जात होता. त्यावेळी तो बसला घासला गेला. तेव्हा त्याने बसला दुचाकी आडवी लावली. बसचालकाला शिवीगाळ करत गाडी वाकडी का घातली, तुम्हाला घोडाच लावतो, अशी धमकी देऊन फिर्यादी यांची हाताने कॉलर पकडून त्यांना व बसचालकाला हाताने मारहाण केली. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अविनाश शेवाळे (PSI Avinash Shewale) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भारती विद्यापीठ आयएमईडीच्या ‘सहयोग 2024’ मेळाव्यास प्रतिसाद

कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी

दुचाकीस्वार रायडरची शाळकरी मुलांच्या दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू; दौंड तालुक्यातील घटना