Pune Police MPDA Action | कोंढवा अन् वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरविणार्‍याविरूध्द एमपीडीएची कारवाई ! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 31 वी स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MPDA Action | पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी कोंढवा (Kondhwa Police Station) आणि वानवडी पोलिस ठाण्याच्या (Wanwadi Police Station) हद्दीत दहशत पसरविणार्‍याविरूध्द एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांची ही 31 वी कारवाई केली आहे. (Pune Police MPDA Action)

 

अरबाज उर्फ लॅब इलियाज खान Arbaaz Alias Lab Ilyaz Khan (24, रा. सर्व्हे नं. 5, आश्रफनगर, लेन नं. 7, अल्ला हु अकबर बिल्डींग, फ्लॅट नं. 202, कोंढवा, पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अरबाज खान हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Pune Police Records) आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह कोंढवा व वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोयता, चॉपर, तलवार, सुरा, लोखंडी रॉड या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, दंगा बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्याविरूध्द 10 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक त्याच्याविरूध्द उघडपणे तक्रार करण्यास पुढे येत नव्हते. (Pune Police MPDA Action)

 

दरम्यान, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे
(Sr PI Santosh Sonawane) यांनी त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई
व्हावी म्हणून पोलिस आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला होता.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करून पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी
अरबाज खान याच्याविरूध्द एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
पीसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे (Sr PI Chandrakant Bedre) यांनी प्रस्तावाची छाननी केली आहे.

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 31 गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अरबाज उर्फ लॅब इलियाज खान याला वर्षभराकरिता नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) स्थानबध्द करण्यात आले आहे.

 

Web Title : Pune Police MPDA Action | MPDA’s action against Arbaaz Alias Lab Ilyaz Khan who spreading terror in Kondhwa and Wanwadi police station limits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा