Pune Police MPDA Action | कोंढवा परिसरातील दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 35 वी स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MPDA Action | कोंढवा पोलिस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या (Pune Crime News) अट्टल गन्हेगाराविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (MPDA Act) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांची ही 35 वी कारवाई केली आहे. (Pune Police MPDA Action)

सोहेल नवाज शेख उर्फ पठाण Sohail Nawaz Shaikh alias Pathan (वय-22 रा. आश्रफनगर, कोंढवा बुद्रुक) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार (Criminal On Pune Police Records) असून त्याने त्याच्या साथीदारांसह कोंढवा व वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadi Police Station) हद्दीत कोयता, चॉपर, तलवार, सुरा, लोखंडी रॉड या हत्यारांसह फिरताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), गंभीर दुखापत करणे, दंगा, यासारखे गंभीर गुन्हे (Pune Crime News) केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्याविरुद्ध 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

आरोपीविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे
सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन
पोलीस आयुक्तांनी आरोपी सोहेल नवाज शेख उर्फ पठाण याला
अमरावती मध्यवर्ती कारागृहात (Amravati Central Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. ही कामगिरी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior PI Santosh Sonwane) , पी.सी.बी. गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक राजु बहिरट (PSI Raju Bahirat) यांनी केली.

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 35 गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sai Tamhankar | अभिनेत्री सई ताम्हणकरने सांगितल्या तिच्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा; व्हिडिओ व्हायरल