Pune Police MPDA Action | सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 42 वी स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MPDA Action | सहकारनगर (Sahakarnagar Police Station) आणि बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या (Bundgarden Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा अट्टल गुन्हेगार सुरज उर्फ डमऱ्या राजु गायकवाड (Suraj alias Damraya Raju Gaikwad) विरुद्ध पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए (Pune Police MPDA Action) कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 42 वी कारवाई आहे.

सुरज उर्फ डमऱ्या राजु गायकवाड (वय-22 रा. म्हसोबा मंदिर, तळजाई माता वसाहत, पद्मावती, सहकारनगर, पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अट्टल गुन्हेगार (Criminal On Pune Police Records) असून त्याने साथीदरांसह सहकारनगर आणि बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी पालघन, कोयता, बांबु यासारख्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, लोकसेवकास त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हल्ला करणे, जबरी चोरी, दुखापत करणे, दंगा, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व जीवीतास धोका निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. (Pune Police MPDA Action)

आरोपी सुरज उर्फ डमऱ्या राजु गायकवाड याच्या विरोधात मागील पाच वर्षात 6 गुन्हे सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आरोपीविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपी सुरज उर्फ डमऱ्या राजु गायकवाड याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कामगिरी सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे (Senior PI Surendra Malale) व
पी.सी.बी. गुन्हे शाखा (P.C.B. Crime Branch)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.टी. खोबरे (Senior PI A.T. Khobare) यांनी केली.

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 42 गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | दोन सराईत वाहनचोरांना समर्थ पोलिसांकडून अटक, रिक्षासह दुचाकी जप्त