Pune Police MPDA Action | येरवडा परिसरात हातभट्टी दारुची विक्री करणाऱ्या महिला गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 83 वी स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MPDA Action | येरवडा पोलीस ठाण्याच्या (Yerwada Police Station) हद्दीत गावठी हातभट्टी दारुचे गुन्हे करणाऱ्या अट्टल महिला गुन्हेगारावर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांची ही 83 वी कारवाई केली आहे. (Pune Police MPDA Action)

विमल विजय राठोड (वय-43 रा. बंजारा मित्र मंडळाजवळ, नाईकनगर, येरवडा पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या अभिलेखावरील सराईत महिला गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीने आणि तिच्या साथीदारांनी येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भेसळयुक्त गावठी हातभट्टी दारुची विक्री करणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील 5 वर्षात तिच्याविरुद्ध 11 गुन्हे दाखल आहेत. तिच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास व जीवीतास धोका निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच तिच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

आरोपीविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव
पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी
आरोपी विमल राठोड हिला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

ही कामगिरी येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.

पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 83 गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
आगामी काळात देखील सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी अशा प्रकारची कारवाई करण्यात
येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | शशिकांत बोराटे पुणे शहर वाहतूक शाखेचे नवे उपायुक्त, डीसीपी विजयकुमार मगर यांची झोन-4 म्हणून नियुक्ती

पुणे : व्याजासाठी तगादा, बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या; सावकारावर गुन्हा दाखल

ठेकेदाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर परिसरातील घटना

Prabha Atre Passed Away | पद्मविभूषण स्वयमयी डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Lashkar Crime News | पत्रकार असल्याचे सांगुन महिन्याला हप्त्याच्या स्वरूपात पैशाची मागणी! भुषण साळवे, संदिप रासकर आणि अक्षय वाघमारे यांच्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल

MP Srinivas Patils Wife Rajni Devi Passes Away | खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी यांचे निधन

Pune Police Inspector Transfer News | पुण्यातील 15 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; मुंढवा, भारती विद्यापीठ, येरवडा, अलंकार पोलीस स्टेशनचा समावेश