Pune Police MPDA Action | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नागपूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 37 वी एमपीडीए कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MPDA Action | चंदननगर पोलिस ठाण्याच्या (Chandannagar Police Station) हद्दीत गंभीर गुन्हे (Pune Crime News) करणाऱ्या अट्टल गन्हेगाराविरुद्ध पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (MPDA Act) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांची ही 37 वी कारवाई केली आहे. (Pune Police MPDA Action)

वैभव शैलेश गायकवाड उर्फ कुणाल गौतम कावरे (वय-23 रा. गायरान वस्ती, केशवनगर मुंढवा) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह चंदननगर, विमानतळ (Viman Nagar Police Station), शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या (Shivaji Nagar Police Station) हद्दीमध्ये लोखंडी रॉड, सत्तुर, कोयता यासारख्या शस्त्रासह फिरताना गंभीर दुखापतीसह दरोडा (Robbery), जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्यावर मागील 5 वर्षात 6 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व जीवीतास धोका निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. (Pune Police MPDA Action)

आरोपी वैभव गायकवाड उर्फ कुणाल कावरे याच्या विरोधात स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपीला नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. ही कामगिरी चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Sr PI Rajendra Landge), पी.सी.बी. गुन्हे शाखा (P.C.B. Crime Branch) पोलीस उपनिरीक्षक राजु बहिरट (PSI Raju Bahirat) यांनी केली.

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 37 गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
आगामी काळात देखील सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bacchu Kadu | ‘…तर मंत्रालयातील सचिव कार्यालयात साप सोडू’, आमदार बच्चू कडूंचा थेट इशारा (व्हिडीओ)

Bhimashankar Temple | भीमाशंकर मंदिर परिसरात मोबाइल वापरास बंदी, मंदिर प्रशासनाचा निर्णय