Pune Police News | घरफोडीत चोरीस गेलेला 80 लाखांचा मुद्देमाल पुणे पोलिसांकडून मुळ मालकाला सुपूर्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | गेल्या वर्षी घरफोडीत चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून जप्त केला होता. न्यायालयाने (Pune Shivaji Nagar Court) आदेश दिल्यानंतर तो तब्बल 79 लाख 84 हजार 480 रूपयाचा मुद्देमाल पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांच्या हस्ते मुळ मालक (फिर्यादी) यांना देण्यात आला आहे. चोरीस गेलला ऐवज पुणे पोलिसांमुळे पुन्हा प्राप्त झाल्याने फिर्यादी ज्येष्ठ नागरिकांच्या चेहर्‍यावर एक आगळा-वेगळा आनंद पहावयास मिळाला. (Pune Police News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 27 नोव्हेंबर 2022 रोजी अलंकार पोलिस स्टेशनच्या (Alankar Police Station) हद्दीमध्ये मोठी घरफोडी झाली होती. चोरटयांनी घरातील तब्बल 98 लाख 15 हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि डायमंड चोरून नेले होते. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाव्दारे तपास सुरू केला. पोलिस अंमलदार धीरज पवार (Police Dhiraj Pawar), पोलिस अंमलदार सागर केकाण (Police Sagar Kekan) आणि नितीन राऊत (Police Nitin Raut) यांना एक पुरूष आणि एक महिला संशयितरित्या घटनास्थळाच्या आजूबाजूला फिरताना आढळून आले. त्याआधारे पोलिसांनी सखोल तपास केला. (Pune Police News)

 

 

 

 

 

अलंकार पोलिस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी, पोलिस अंमलदार धीरज पवार, सागर केकाण आणि नितीन राऊत यांनी संशयावरून राजु दुर्योधन काळमेघ Raju Duryodhan Kalmegh (45, रा. एन.बी. पर्ल सोसायटी, क्रांतीनगर, वडगाव-बुद्रुक, पुणे) याला अटक केली. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने साथीदार सोनिया पाटील हिच्यासोबत मिळून घरफोडी केल्याचे कबुल केले.

दरम्यान, पोलिसांनी सोनिया श्रीराम पाटील Soniya Shriram Patil
(32, रा. एन.बी. पर्ल सोसायटी, क्रांतीनगर, वडगाव बुद्रुक, पुणे) हिला शोधून अटक केले.
पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगिता पाटील (PI Sangeeta Patil) यांनी या गुन्हयाचा तपास केला.
पोलिसांनी चोरीस गेलेल्या ऐवजापैकी तब्बल 79 लाख 84 हजार 480 रूपयाचा ऐवज जप्त केला. न्यायालयाचे आदेश झाल्यानंतर आज पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते फिर्यादीला ऐवज सुपूर्द करण्यात आला.

यावेळी पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma),
अलंकार पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश तटकरे (Sr PI Rajesh Tatkare),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगिता पाटील उपस्थित होत्या. पोलिस आयुक्त रितेश कुमार
यांनी पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगीता पाटील यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला आहे.

 

 

Web Title : Pune Police News | 80 lakh worth of goods stolen in house burglary handed over to original owner by Pune Police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा