Maharashtra Monsoon Update | येत्या 2 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल; हवामान खात्याचा अंदाज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात मान्सून (Maharashtra Monsoon Update) दाखल होणार आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून माणसाची सूटका होणार आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दोन्ही बाजूंनी अनुकूल हवामानामुळे येत्या 48 तासांत गोव्यासह (Goa) महाराष्ट्राच्या (Maharashtra) काही भागांत मान्सून दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) वर्तवला आहे. मान्सूनने ईशान्येकडील बहुतांश राज्ये व्यापून शनिवारी कर्नाटकातील कारवार गाठले आहे.

 

यावर्षी एक आठवडाभर उशिराने मान्सून (Maharashtra Monsoon Update) केरळात (Kerala) दाखल झाला आहे. त्यानंतर हवामान अनुकूल राहिल्याने मान्सून वेगाने पुढे सरकला आहे. अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biporjoy ) सक्रिय असल्याने मान्सून पश्चिम किनार्‍यावरूनच प्रगती करत आहे, तर दुसरीकडे बांगलादेश जवळ (Bangladesh) कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने मान्सूनची प्रगती पूर्वेकडून तुलनेने अधिक आहे.

 

 

 

शनिवारी मान्सूनने केरळचा उर्वरित भाग, कर्नाटक (Karnataka) आणि तामिळनाडूचा (Tamil Nadu) 48 तासांत आणखी प्रगती अपेक्षित असून, सोमवारपर्यंत कर्नाटकचा आणखी काही भाग, गोवा, महाराष्ट्राचा काही भाग; तसेच ईशान्येकडील उर्वरित राज्ये आणि पश्चिम बंगालचा काही भाग मान्सून व्यापू शकतो, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने (IMD) दिली आहे.

दरम्यान, राज्यातील काही भागात मान्सूनचे आगमन अपेक्षित असले तरी पेरणीसाठी आवश्यक असलेल्या
पावसासाठी आणखी दहा दिवस वाट पहावी लागेल, असे हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. एम. राजीवन (Dr. M. Rajeevan) म्हणाले, ‘मान्सून सध्या वेगाने पुढे जात असेल,
तर 20 जूनपूर्वी मान्सूनचे ट्रफ आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची चिन्हे नाहीत.
20 जूननंतर, सर्वत्र पाऊस सुरू झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी.’

 

Web Title :  Maharashtra Monsoon Update | conditions were favourable for the further advance of the southwest monsoon into some parts of maharashtra next 48 hours Cyclone Biporjoy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा