Pune Police News | पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांचा पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात निरोप समारंभ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | पुणे पोलीस दलातील परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma) यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI) येथे बदली झाल्याने पोलीस आयुक्त कार्यालयात (Pune Police News) निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांच्याहस्ते सुहेल शर्मा यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रभारी सह पोलिस आयुक्त आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया (IPS Arvind Chavriya), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), पुणे वाहतुक शाखेचे (Pune Traffic Police) पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijayakumar Magar), पोलीस उपायुक्त मुख्यालय रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar), नवनियुक्त पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam) तसेच इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. (Pune Police News)

सुहेल शर्मा हे आय.पी.एस म्हणून 2012 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात (Maharashtra Police) रुजू झाले. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातुन आपल्या पोलीस कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, मुंबई आणि पुणे शहर येथे कर्तव्य बजावले आहे. 2016 मध्ये उत्तर (चीन) च्या बाजूने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest) यशस्वीरित्या चढाई करणारे ते पहिले आयपीएस अधिकारी आहेत. या सहसा बरोबरच त्यांनी ऑक्सफर्ड या विद्यापीठातून (Oxford University) कायदा व धोरणे यामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.

पुणे पोलीस आयुक्तालयात 15 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 म्हणून पदभार स्वीकारला. पोलीस उपायुक्त म्हणून कर्तव्य बजावत असताना, त्यांनी परिमंडळ तीन मधील संवेदनशील व महत्वाच्या गुन्ह्यांचा तपास उत्कृष्ठपणे केला. तसेच गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अधिकारी यांना योग्य मार्गदर्शन केले. त्यांना 25 डिसेंबर रोजी पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरुन केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग या ठिकाणी झालेल्या बदलीवर मोकळीक करण्यात आलेली आहे.