Pune Police News | पुणे : अपंग व्यक्तीला मदत करुन पोलिसांनी दाखवली ‘खाकी’तली माणुसकी!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | पुणे शहर पोलीस दलातील ‘माणुसकी’चा अनुभव आतापर्यंत अनेकांना आला आहे. पुणे वाहतूक शाखेत (Pune Traffic Police ) कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचारी नितू जाधव यांनी अपंग व्यक्तीला मदत करुन माणुसकी दाखवली. हा प्रकार गुरुवारी (दि.28) सकाळी फर्ग्युसन कॉलेज रोडवर (FC Road Pune) घडला.(Pune Police News)

गुरुवारी सकाळी एका व्यक्तीने एफसी रोडवर नकळत नो पार्किंगमध्ये गाडी लावली. त्यामुळे डेक्कन वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गाडीला जामर लावून कारवाई केली. त्यानंतर गाडीचा चालक त्याठिकाणी आल्यावर त्याला जामर लावल्याचे दिसून आले. त्याने वाहतूक पोलिसांना फोन केल्यानंतर महिला पोलीस कर्मचारी नितू जाधव या गाडीजवळ आल्या. त्यांनी चालकाला रितसर ऑनलाईन पावती फाडण्यास सांगितले.

चालकाने गाडीत अपंग रुग्ण असल्याची माहिती नितू जाधव यांना दिली.
त्यांनी क्षणाचाही विचार न करता स्वत: गाडीतून खाली उतरुन अपंग व्यक्ती विचारपूस केली.
तसेच दंडाची पावती न फाडता चालकाला गाडी घेऊन जाण्यास सांगितले.
मार्च एडिंग असताना वाहतुक पोलिसांकडून दंड वसुल करण्याची कारवाई केली जात आहे. तसेच बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे.

मात्र, पोलीस कर्मचारी नितू जाधव यांनी गाडीतील अपंग व्यक्तीची अवस्था पाहून त्यांना सोडून देत माणूसकी दाखवली. याबाबत अपंग व्यक्तीने व वाहन चालकाने नितू जाधव यांचे आभार मानून तुमच्या हातून सेवा देश सेवा घडत राहो अशी ईच्छा व्यक्त केली. नितू जाधव यांनी दाखवलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Nilesh Lanke | नगरमध्ये राजकीय हालचालींना वेग, निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, बोलावली तातडीची सभा

Pune Court News | पुणे : पार्किंगच्या वादातून खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला जामीन मंजूर

Mumbai To Pune Cabs | मुंबई ते नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास महागणार, जाणून घ्या नवे दर

Vasant More-Prakash Ambedkar | वसंत मोरे उमेदवारीसाठी आता प्रकाश आंबेडकरांना भेटणार? जरांगे-आंबेडकर-शेंडगे समीकरणातून ठरू शकतात ‘गेम चेंजर’

Bachchu Kadu Targets Navneet Rana | बच्चू कडू वर्ध्यातून निवडणूक लढवणार? ३०० कार्यकर्त्यांनी रक्तदानाद्वारे केली मागणी, नवनीत राणांबद्दल म्हणाले…

Pune Kothrud Crime | पुणे : कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी, आयटी इंजिनिअरवर गुन्हा दाखल