Pune Police News | पुणे पोलिस आयुक्तालयाच्या ‘सायंटिफिक एडस् टू इन्व्हेस्टिगेशन’ टीमला उत्कृष्ट सांघिक कामगिरीसाठी पारितोषिक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | पुण्यातील रामटेकडी येथील राज्य राखीव पोलीस दल गट क्र. 1 व 2 (Ramtekdi SRPF Group 1) तसेच महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी (Maharashtra Intelligence Academy (MIA) येथे पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या Criminal Investigation Department Maharashtra State (Maharashtra CID) वतीने 18 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-2023 चे (Maharashtra State Police Duty Meet 2023) 1 ते 9 सप्टेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर (Dr Raghunath Mashelkar) यांच्या हस्ते राज्य राखील पोलीस दल गट क्र. 2 च्या परेड मैदानावर करण्यात आले.

या स्पर्धेत पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या (Pune City Police) सायंटिफिक एड्स टू इन्व्हेस्टिगेशन या टिमला (Scientific Aids in Criminal Investigation Team) उत्कृष्ट संघिक कामगिरी करीता सांघिक पारितोषिक मिळाले आहे. हे पारितोषिक पोलिस महासंचालक रजनीश सेठ (IPS Rajnish Seth) यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) तसेच अप्पर पोलिस महासंचालक सुनिल रामानंद (IPS Sunil Ramanand) यांच्यासह इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. (Pune Police News)

पोलीस कर्तव्य मेळावा-2023 च्या स्पर्धेत पुणे शहर दलाचा संघ सहभागी झाला होता. सायंटिफिक एडस् टू इन्व्हेस्टिगेशन या स्पर्धेच्या प्रकारात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड (PI Nandkumar Gaikwad), आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक ज्योती मेढे (API Jyoti Medhe), पोलीस उपनिरीक्षक चैताली गपट (PSI Chaitali Gapat), खडक पोलीस ठाण्याचे (Khadak Police Station) पोलीस हवालदार आर.एच. घोलप (Police RH Gholap), महिला पोलीस अंमलदार उत्कर्षा वाघ (Female Police Utkarsha Wagh) यांनी सहभाग घेतला होता. (Pune Police News)

सायंटिफिक एडस् टू इन्व्हेस्टिगेशन या प्रकारात फिंगर प्रिंट या विषयात ज्योती मेढे यांना रौप्य पदक, फॉरेन्सिक सायन्स या विषयात चैताली गपट यांना रोप्य पदक, पुणे शहर बॉम्ब शोधक व नाशक पथकातील डॉग विराट व त्याचे हॅण्डलर पोलीस हवालदार शैलेश शिरतोडे यांना एक्सप्लोजिव्ह (स्निफर डॉग) या प्रकारात रौप्य पदक अशी वैयक्तीक पारितोषिके मिळाली आहेत.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या सायंटिफिक एडस् टू इन्व्हेस्टिगेशन या टिमला उत्कृष्ट सांघिक
कामगिरीबद्दल सांघिक पारितोषिक देण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सांगता
राज्याचे पोलीस महासंचालक रजनिश शेठ यांच्या उपस्थितीत झाली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे खून प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, कारण आलं समोर

पुणे पोलिसांकडून पावणे पाच कोटींचा अमली पदार्थांचा साठा नष्ट

खरेदी केलेली अ‍ॅम्ब्युलन्स नावावर करुन न देता कंपनीची फसवणूक, खेड येथील घटना