Pune Crime News | खरेदी केलेली अ‍ॅम्ब्युलन्स नावावर करुन न देता कंपनीची फसवणूक, खेड येथील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कंपनीने खरेदी केलेली अ‍ॅम्ब्युलन्स नावावर न करुन देता कंपनीची सव्वादोन लाखांची आर्थिक फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 25 फेब्रुवारी 2022 रोजी खेड तालुक्यातील निघोज येथील इंम्पेरीअल अॅटो इंडस्ट्रीज लि. या कंपनीत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत कंपनीचे एचआर रवि राघवेंद्र धुतेकर (वय-50 रा. बापदेव नगर, देहूरोड, किवळे ता. हवेली) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahalunge MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी झाकीर खान Zakir Khan (रा. जिल्हा परिषद कॉटर, छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध आयपीसी 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करीत असलेल्या कंपनीसाठी एक अ‍ॅम्ब्युलन्स वाहनाची आवश्यकता होती. फिर्यादी हे इंटरनेटच्या माध्यमातून अ‍ॅम्ब्युलन्स शोधत होते. त्यानंतर आरोपीकडे अ‍ॅम्ब्युलन्स वाहन उपलब्ध असल्याने फिर्यादी यांनी संपर्क साधला. 25 फेब्रुवारी 2022 रोजी आरोपी हा फिर्यादीच्या कंपनीमध्ये अ‍ॅम्ब्युलन्स वाहन मारुती ओमीनी (एमएच01 एसए. 4173) घेवुन आला होता. त्यावेळी फिर्यादीने यांनी आरोपीच्या मालकीची असलेल्या अ‍ॅम्ब्युलन्सची पाहणी केली. गाडी जुनी असल्याने खरेदी किंमत दोन लाख विस हजार रुपये इतकी ठरली. त्याप्रमाणे फिर्यादीने गाडी आरोपीकडून विकत घेऊन दोन लाख रुपये कंपनीच्या खात्यावरुन आरटीजीएस करुन दिले. उर्वरीत 20 हजार रुपये गाडी कंपनीच्या नावे करुन दिल्यानंतर आरोपी याला देण्याचे ठरले होते.

गाडी कंपनीच्या नावावर करुन देण्याची जबाबदारी आरोपीने स्विकारलेली होती.
त्या बदल्यात त्याने विश्वासाने फिर्यादीकडुन रक्कम स्विकारलेली होती.
त्यावेळी त्याने फिर्यादीला गाडीचे आरसी बुक दिले नव्हते. तसेच वाहन हे स्वत:चे असल्याचे फिर्यादीला सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीला वेळोवेळी संपर्क साधुन तसेच समक्ष भेट घेवून गाडी कंपनीच्या नावे करुन देण्याबाबत विचारणा केली. परंतु त्याने टाळाटाळ करुन फिर्यादी यांच्या कंपनीची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Fraud Case)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Ganeshotsav 2023 | सावधान… तिसऱ्या डोळ्याची ‘नजर’ ! गणेशोत्सवात पुणे शहराच्या
विविध भागात 1800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

नागरिकांना हत्याराचा धाक दाखवून मोबाइल चोरणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड,
4 लाखांचा मुद्देमाल जप्त

सावधान! आक्षेपार्ह पोस्ट कराल तर खबरदार, पुसेसावळीतील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

Pornography Case | केवळ वासना नव्हे सेक्स, प्रेमसुद्धा आहे, पोर्नोग्राफी केसमध्ये केरळ हायकोर्टाची टिप्पणी