Pune Police News | पुणे पोलिसांकडून पावणे पाच कोटींचा अमली पदार्थांचा साठा नष्ट

Pune Police News | Deportation action against 65 innkeepers in 7 months from the police station limits of Zone-5 of Pune Police Commissionerate.
ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | पुणे शहर आयुक्त कार्यक्षत्राच्या हद्दीतील 21 पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी (Drug Trafficking) करणाऱ्यांकडून जप्त केलेला अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी नष्ट केलेल्या (Destroy Drug Stocks) अमली पदार्थांमध्ये गांजा (Ganja), कोकेन (Cocaine Drug), मेफेड्रोन Mephedrone (MD), चरस (Charas), हिरॉईन (Heroin Drugs) अशा ड्रग्जचा समावेश होता. चार कोटी 75 लाख 53 हजार रूपये किमतीच्या अमली पदार्थांची रांजणगाव (Ranjangaon) येथील एमईपीएल कंपनीच्या भट्टीत विल्हेवाट लावण्यात आली. (Pune Police News)

पोलिसांनी नष्ट केलेल्या अंमली पदार्थांमध्ये 67 लाख 78 हजार 020 रुपयांचा 338 किलो 901 ग्रॅम 291 मिलीग्रॅम गांजा, 1 कोटी 67 लाख 17 हजार 214 रुपयांचा 1 किलो 114 ग्रॅम 481 मिलीग्रॅम मेफेड्रोन (एमडी), 2 कोटी 13 लाख 94 हजार 485 रुपयांचे 1 किलो 426 ग्रॅम 299 मिलीग्रॅम कोकेन, 19 लाख 66 हजार रुपये किमतीचे 1 किलो 966 ग्रॅम चरस, 2 लाख 87 हजार 530 रुपये किमतीचे 28 किलो 753 ग्रॅम पॉपीस्ट्रॉ, 4 लाख 9 हजार 872 रुपये किंमतीचे 136 ग्रॅम 624 मिलीग्रॅम हेराईन असा एकूण 4 कोटी 75 लाख 53 हजार रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला. (Pune Police News)

भारत सरकार अर्थ मंत्रालय, महसुल विभाग, नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या अधिसुचनेनुसार तसेच महाराष्ट्र शासन गृहविभाग (विशेष) यांच्या अधिसुचना व तरतुदीनुसार तसेच राज्याचे पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभागाच्या परिपत्रकानुसार मंगळवारी (दि.12) पुणे शहर आयुक्तालयातील मुद्देमाल नाश कमिटीचे अध्यक्ष अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), कमिटी सदस्य पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे (DCP Amol Zende), पोलीस उपायुक्त मुख्यालय रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar), सहायक रासायनिक विश्लेषक जि. भ. सदाकाळ, वैज्ञानिक सहाय्यक प्रादेशिक न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा पुणे प्र. अ. लेंडे, क्षेत्र अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ पुणे प्रमोद डोके, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बी विभाग विठ्ठल बोबडे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क जी विभाग एस.के. कोल्हे यांच्या उपस्थित अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे,
पोलीस उपायुक्त मुख्यालय रोहिदास पवार, पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते (PI Ashwini Satpute),
सुनिल थोपटे (PI Sunil Thopte), आनंदराव खोबरे, सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके, दिगंबर चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, शिवाजी घुले, पोलीस अंमलदार राहुल जोशी, संतोष देशपांडे, पांडुरंग पवार, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी, रविंद्र रोकडे, चेतन गायकवाड, प्रसाद बोमादंडी, विशाल शिंदे, सचिन माळवे, रेहाना शेख, दिशा खेवलकर, स्वाती राऊत, सविता कळस्कर, संदेश काकडे, संदिप शेळके, साहिल शेख, अजिम शेख, युवराज कांबळे, योगेश मोहिते, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, नितेश जाधव, दिनेश बास्टेवाड यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

खरेदी केलेली अ‍ॅम्ब्युलन्स नावावर करुन न देता कंपनीची फसवणूक, खेड येथील घटना

सावधान… तिसऱ्या डोळ्याची ‘नजर’ ! गणेशोत्सवात पुणे शहराच्या विविध भागात 1800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

नागरिकांना हत्याराचा धाक दाखवून मोबाइल चोरणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

Total
0
Shares
Related Posts