Pune Crime News | गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे खून प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, कारण आलं समोर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | उरूळी कांचन येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांच्या खून प्रकरणातील (Hotel Garva Owner Ramdas Akhade Muder Case) आरोपी बाळासाहेब जयवंत खेडेकर Balasaheb Jaywant Khedekar (वय-60 रा. उरळी कांचन ता. हवेली) याचा उपचारादरम्यान मत्यू झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात रामदास आखाडे यांच्या खून प्रकरणाची चर्चा झाली होती. या प्रकरणातील आरोपी खेडेकर याचा हृदयविकाराच्या झटका आल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Crime News)

हॉटेल गारवाचे मालक रामदास आखाडे यांचा 18 जुलै 2021 रोजी त्यांच्या हॉटेल जवळ कोयता आणि तिक्ष्ण हत्याराने खून केला होता. या घटनेत आखाडे गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत गुन्ह्यातील आरोपींना अटक केली होती. त्यामध्ये बाळासाहेब खेडकर त्याच्या मुलगा आणि इतर दहा जणांचा समावेश होता. या गुन्ह्यातील 10 आरोपींवर तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाई केली होती. (Pune Crime News)

लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या (Loni Kalbhor police station) हद्दीत 18 जुलै रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे यांची दोन अनोळखी इसमांनी दुचाकीवरुन येऊन वार केले. आरोपींनी रामदास आखाडे यांच्या डोक्यात, हातावर, पायावर तलवारीने सपासप वर करुन गंभीर जखमी केली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान 21 जुलै रोजी मृत्यू झाला.

आरोपी बाळासाहेब खेडेकर याच्या हॉटेल जवळच रामदास आखाडे यांचे गारवा हॉटेल होते.
हॉटेल गारवामुळे हॉटेल चालत नसल्याने खेडकर याने त्याच्या मुलाला सोबत घेऊन आखाडे यांच्यावर धारदार कोयता व तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. यात त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, आता या गुन्ह्यातील आरोपी बाळासाहेब खेडेकर याचा मृत्यू झाला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे पोलिसांकडून पावणे पाच कोटींचा अमली पदार्थांचा साठा नष्ट

खरेदी केलेली अ‍ॅम्ब्युलन्स नावावर करुन न देता कंपनीची फसवणूक, खेड येथील घटना

सावधान… तिसऱ्या डोळ्याची ‘नजर’ ! गणेशोत्सवात पुणे शहराच्या विविध भागात 1800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

नागरिकांना हत्याराचा धाक दाखवून मोबाइल चोरणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

सावधान! आक्षेपार्ह पोस्ट कराल तर खबरदार, पुसेसावळीतील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर