Pune Police | पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या; प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर पोलीस (Pune Police) दलात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने (Policeman) लोणी काळभोर येथील राहत्या घरात गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केल्याची (Commits Suicide) घटना आज (गुरुवार) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. सुनील नारायण शिंदे Sunil Narayan Shinde (वय-48 रा. कवडी माळवाडी ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाहीत.
सुनील शिंदे हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) कार्यरत होते. त्यांनी बुधवारी (दि.27) मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शिंदे हे हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कवडीमाळवाडी परिसरात मागील अनेक वर्षांपासून वास्तव्यास होते. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. आज सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी पंख्याला खिडकीच्या पडद्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले.
सकाळी अकराच्या सुमारास शिंदे यांचा मुलगा वडिल उठले का नाहीत हे पाहण्यासाठी गेला.
त्याने खोलीचा दरवाजा ठोठावला, वडिलांना आवाज दिला. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
त्यामुळे त्याने खिडकीतून पाहिले असता सुनील शिंदे यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील (Loni Kalbhor Police Station)
पोलीस निरीक्षक अमोल घोडके (Police Inspector Amol Ghodke) व पोलीस हवालदार भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली.
Web Title :- Pune Police | pune city policeman commits suicide at his residence in loni kalbhor pune crime news
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Weight Loss Drink | ‘या’ फळापासून तयार करा स्पेशल चहा, लोण्यासारखी वितळेल चरबी
- Supreme Court On OBC Political Reservation Maharashtra | सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का, ‘त्या’ निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच
- Diabetes | स्वयंपाक घरातील ‘या’ मसाल्याने कंट्रोल होईल ब्लड शुगर, डायबिटीजच्या रूग्णांनी असा करावा वापर