Pune News : मंहमदवाडी येथील क्लब 24 वर पोलिसांचा छापा; मध्यरात्रीनंतरही पबमध्ये सापडले 104 तरुण-तरुणी

पुणे : मंहमदवाडी परिसरातील क्लब २४ या पबवर पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी मध्यरात्री छापा घातला असून त्यावेळी तेथे तब्बल १०४ तरुणतरुणी आढळून आले. रात्री ११ नंतर संचारबंदी जारी केली असताना तेथे कोरोनाचे सर्व नियम तोडून तरुण तरुणी धुमाकुळ घालत असल्याचे आढळून आले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रात्री ११ पर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट, पब यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच रस्त्यावरही संचारबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. असे असतानाही क्लब २४ पबमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणी जमले असून विकएंड साजरा करीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना मिळाली. त्यानुसार यांनी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास या क्लब २४ वर छापा घातला. त्यात तब्बल १०४ तरुणतरुणींना पकडण्यात आले. त्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यातून कुमक मागविण्यात आली.