Pune Police Traffic Update | धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संगमवाडी परिसरातील वाहतुकीत बदल

खासगी ट्रॅव्हल्स संगमवाडी येथे न थांबता खराडी जकात नाका येथे थांबतील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Traffic Update | बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर (Dhirendra Shastri alias Bageshwar) यांचा ‘श्री हनुमान कथा सत्संग’ (Shri Hanuman Katha Satsang) कार्यक्रम 20 ते 22 नोव्हेंबर रोजी जगदीश मुळीक फाउंडेशनकडून (Jagadish Mulik Foundation) संगमवाडी येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संगमवाडी रोड व परिसरातील वाहतूक सुरळीत रहावी यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने (Pune Police Traffic Update) या परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे.

20 ते 22 नोव्हेंबर दरम्यान संगमवाडी येथे खासगी बसेस पार्कींग व थांबा बदलण्यात आला आहे. खासगी बसेस संगमवाडी ऐवजी खराडी जकात नाका येथे थांबवणार आहेत. या ठिकाणाहून प्रवाशांचा पिकअप आणि डॉप पॉईंट असणार आहे. हा बदल तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आला आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. हे आदेश अत्यावश्यक सेवेतील वाहने, उदा. पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन यांना लागू राहणार नाहीत. (Pune Police Traffic Update)

वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे

  1. पिंपरी चिंचवड परिसरातून जुना पुणे मुंबई महामार्गावरुन संगमवाडी पार्किंग येथे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बोपोडी चौक, डावीकडे वळुन खडकी बाजार, होळकर पुल, चंद्रमा चौक, सादलबाबा चौक, पर्णकुटी चौक मार्गे नगर रोडने खराडी जकात नाका येथे जातील.
  2. नगर रोडवरुन पिंपरी चिंचवड परिसरामध्ये जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसेस नगर रोड, शास्त्रीनगर चौक, गोल्फ क्लब चौक, आंबेडकर चौक, आळंदी रोड जंक्शन, चंद्रमा चौक, होळकर पुल, पोल्ट्री फार्म चौक मार्गे जुना पुणे मुंबई महामार्गाकडे जातील.
  3. पुणे विद्यापीठ चौकातुन संगमवाडी पार्किंगडे येणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस विद्यपीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, आर.टी.ओ. चौक, जहाँगीर चौक, आंबेडकर सेतूवरून पर्णकुटी चौक मार्गे नगर रोडने खराडी जकात नाका येथे जातील.
  4. नगर रोडकडून पुणे विद्यापीठ चौकाचे दिशेने जाणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस नगर रोड पर्णकुटी चौक, महात्मा गांधी उद्यान, जहाँगीर चौक, आर.टी.ओ. चौक, संचेती चौक, सिमला ऑफिस चौक, विद्यापीठ चौक मार्गे जातील.
  5. नगर रोडवरुन संगमवाडी पार्किंग करीता येणाऱ्या बसेसना संगमवाडी येथे प्रवेश बंद असल्याने या बसेस शास्त्रीनगर चौक, गोल्फ क्लब चौक मार्गे आंबेडकर चौक येथे येवून आंबेडकर चौकाचे पुढे प्रवाशांना उतरवुन अन्यत्र पार्किंग कराव्यात.
  • दिनांक 20 ते 22 या कालावधीत संगमवाडी येथील कार्यक्रमाच्या ठिकाणच्या गर्दीचा आढावा घेऊन
    आवश्यकतेनुसार पाटील इस्टेट चौक ते सादलबाब चौक (संगमवाडी मार्ग) दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना तात्पुरता प्रवेश बंद केला जाईल.

पर्य़ायी मार्ग

  1. जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन येणाऱ्या वाहनांकरिता
  • पोल्ट्री फार्म चौक, 8 मुळा रोडने होळकर पूल, चंद्रमा चौक, सादलबाबा चौक मार्गे इच्छितस्थळी
  1. सिमला ऑफिस चौकामधुन येणाऱ्या वाहनांकरीता
  • सिमला ऑफीस चौक, संचेती चौक, इंजिनिअरींग कॉलेज चौक, आरटीओ चौक, जहाँगीर चौक,
    आंबेडकर सेतू, सादलबाबा चौक मार्गे इच्छितस्थळी.
  1. नगर रोडवरुन येणाऱ्या वाहनांकरीता
  • पर्णकुणी चौक, बंडगार्डन रोडने आरटीओ चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक मार्गे इच्छितस्थळी
  1. विश्रांतवाडी कडून येणाऱ्या वाहनांकरीता
  • चंद्रमा चौक, होळकर पुल, 8 मुळा रोडने इच्छितस्थळी
  1. आंबेडकर चौकातून येणाऱ्या वाहनांकरीता
  • सादलबाबा चौक, पर्णकुटी चौक, महात्मा गांधी उद्यान, जहाँगीर चौक, आरटीओ चौक मार्गे इच्छित स्थळी.
    किंवा सादलबाबा चौक, उजवीकडे वळण घेऊन चंद्रमा चौक,
    होळकर पुलावरुन 8 मुळा रोडने कमल नयन बजाज उद्यान मार्गे इच्छित स्थळी.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | पुण्यात जरांगे पाटील यांची सभा, पुणे-नगर रोडवरील वाहतूक व्यवस्थेत बदल