Pune Political News | ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पुण्यात रंगली राजकीय नेत्यांची धुळवड; रवींद्र धंगेकर, मेधा कुलकर्णी, रुपाली चाकणकर एकत्र (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Political News | ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आलेली यंदाची धुळवड राजकीय रंगात न्हावून निघाली. लोकसभेच्या उमेदवारांसह दिग्गज पुढाऱ्यांनी धुळवडीचा आनंद जल्लोषात साजरा केला. ऐन निवडणुकीच्या मुहूर्तावर एक दिवस प्रचाराला आराम देऊन पुण्यातील राजकीय नेत्यांनी धुळवडीचा आनंद लुटला. पुण्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजप नेत्या मेधा कुलकर्णी आणि रुपाली चाकणकर यांनी यांनी एकत्र रंग खेळताना दिसून आले.(Pune Political News)

धुळवडीचा आनंद जल्लोषात साजरा करण्यासाठी शहरातील लॉन्स मध्ये अभिनेते, कलाकारांना बोलावून मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोसायट्यांमधून लहान मुले, कुटुंब रंग खेळण्यात दंग झाल्याचे दिसून आले आहे. पुण्यातील रास्ता पेठेतील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या मैदानावर भोई प्रतिष्ठान च्या वतीने विशेष मुलांसाठी रंग बरसे हा रंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

याशिवाय पोलीस, प्रशासन, चित्रपट, साहित्य, कला, संस्कृती, पत्रकार, राजकारण, समाजकारण या विविध क्षेत्रातील
लोकांनी मुलांसोबत रंग खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी राजकारण बाजूला ठेवूया आणि आजचा दिवस होळीच्या
रंगात न्हाऊन जाऊया असं मत पुण्यातील तीन बड्या नेत्यांनी व्यक्त केलं आहे. इतर दिवशी एकमेकांवर राजकीय टीका टिपणी करणाऱ्या विविध पक्षातील नेत्यांनी आज एकत्र येत एकमेकांना रंग लावला. या वेळी या तिघांनी एकमेकांना रंग लावून राजकारण आजच्या दिवशी विसरून जायचं आणि रंगाच्या या सणाचा आनंद लुटायचा अशी प्रतिक्रिया दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Parvati Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी गजाआड

Kangana Ranaut-Mandi Lok Sabha | कंगना रनौतला भाजपकडून उमेदवारी जाहीर, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली…

Mahavikas Aghadi-Shivsena | आज मविआची निर्णायक बैठक, उद्या शिवसेना उमेदवारांची पहिली यादी येणार, जाणून घ्या संभाव्य नावे