Pune Political News | पुण्यातील चार विद्यमान आमदारांच्या जागा धोक्यात!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Political News | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर अनेक संस्थांचा सर्व्हे समोर येत आहे. प्रत्येक सर्व्हेमध्ये (Survey) वेगवेगळे दावे केले जात आहे. न्यूज एरिना (News Arena) या संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये पुण्यातील चार विद्यमान आमदारांच्या जागा धोक्यात असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Pune Political News) ज्यामध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघ (Indapur Assembly Constituency) राष्ट्रवादीच्या (NCP) हातून निसटणार असल्याचा दावा सर्व्हेत करण्यात आला आहे. याशिवाय पुणे शहरातील कसबा (Kasba), कॅन्टोन्मेंट (Cantonment), वडगाव शेरी (Vadgaon Sheri) आणि शिवाजीनगर मतदारसंघात (Shivajinagar) बदल होणार असल्याचा अंदाज न्यूज एरिना या संस्थेने केलेल्या ताज्या सर्व्हेत वर्तवला आहे.

 

पुणे शहरातील कसबा मतदारसंघात काँग्रेसचा (Congress) तर वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. कोथरुड, पर्वती, शिवाजीनगर आणि कॅन्टोंमेंटमध्ये भाजपचे आमदार (BJP MLA) आहेत. यापैकी शिवाजीनगर मतदारसंघात भाजपला धक्का बसून ही जागा काँग्रेसच्या ताब्यात जाईल, तर वडगाव शेरी मध्ये राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागेल. या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Pune Political News)

 

2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेस अखेरच्या फेरीत मागे पडल्याने याठिकाणी भाजपचे सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) विजयी झाले होते. तर वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांचा निसटत्या मतांनी विजय झाला होता. तसेच कॅन्टोमेंटमध्ये सुनील कांबळे (Sunil Kamble) यांचा देखील 5012 मतांनी विजय झाला होता. हे तीनही जागा दोन्ही पक्षांसाठी धोकादायक असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या
कसबा विधानसभा पोट निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे विजयी झाले.
असे असले तरी पुढील निवडणुकीत ही जागा पुन्हा भाजपकडे जाईल, असे सर्व्हेत म्हटले आहे.
तसेच इंदापूरची जागा सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.
मात्र आगामी निवडणुकीत या ठिकाणी राष्ट्रवादीला धक्का बसून ही जागा भाजपकडे जाईल असेही सर्व्हेत म्हटले आहे.
2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) हे विजयी झाले होते.

 

पुणे जिल्ह्यात भाजप मोठा पक्ष

पुणे जिल्ह्यात एकूण 21 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी सर्वाधिक 9 जागा भाजप जिंकेल असे सर्व्हेत म्हटले आहे.
भाजप खालोखाल राष्ट्रवादीला 8, काँग्रेला 4 जागा मिळतील असे दाखवण्यात आले आहे.
सध्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 10, भाजपचे 8 आणि काँग्रेसचे 3 आमदार आहे.
सर्व्हेनुसार राष्ट्रवादीच्या दोन जागा कमी होऊन भाजप आणि काँग्रेसची प्रत्येकी एक जागा वाढणार आहे.

 

Web Title :  Pune Political News | seats of the existing four mlas in pune city are in danger shivajinagar kasba vadgaon sheri cantonment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

ACB Trap News | Police constable walks into ACB net while accepting Rs 12,000 bribe

Pune PMC Property Tax | Property owners to get 5-10% rebate on general tax; PMC announces lottery scheme

Pune Police Inspector Transfers | 14 Police Inspectors transferred in Pune; They include senior PIs of Swargate,
Mundhwa, Khadki, Alankar, Warje Malwadi, Uttam Nagar, Khadak and Koregaon Park police stations