Pune Porsche Car Accident Case | पुणे पोर्शे कार अपघातानंतर अल्पवयीन आरोपीच्या नावाने रॅप साँग, दोघांवर गुन्हा दाखल (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Porsche Car Accident Case | पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातानंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. याचाच फायदा घेत, आणि आरोपीविरूद्ध आणखी संताप व्यक्त व्हावा, यासाठी सोशल मीडियावर काही जणांनी एक रॅप साँगचा व्हिडिओ पोस्ट केला होता (Kalyani Nagar Accident) . यामुळे लोकांचा संताप आणखीच वाढला. लोकांना वाटलं अपघातातील अल्पवयीन मुलगा लोकांना डिवचत आहे. परंतु, हा व्हिडिओ त्याने बनवला नव्हता. हा व्हिडिओ बनवणारा रॅपर आणि तो पोस्ट करणारा अशा दोघांवर सायबर सेलने गुन्हा दाखल केला होता. (Cyber Cell of Pune Police has registered an FIR against a reel creator and one other who had made a purported video where he was talking about the release of the accused)

रॅप साँगचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा अल्पवयीन आरोपीविरोधात जनमानसात संतापाची लाट उसळली होती. आरोपीने जामीन मिळाल्यानंतर हा व्हिडीओ तयार केल्याचे सुरुवातीला म्हटले जात होते. यानंतर अल्पवयीन आरोपीच्या आईने एक व्हिडिओ बनवून हा आपला मुलगा नसून त्याच्या नावाने खोटा व्हिडिओ बनवण्यात आल्याचे सांगितले, यावेळी या महिलेला रडू आवरले नाही.(Pune Porsche Car Accident Case)

दरम्यान, या प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही याबाबत सक्त कारवाईचे संकेत
दिले होते. त्यानुसार हा व्हिडिओ बनवून तो इन्स्टाग्रामवर पोस्ट करणाèया दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी आता इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ टाकणाऱ्या शुभम शिंदे आणि रॅपर आर्यन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुणे पोलिसांच्या सायबर सेलमध्ये (Pune Cyber Cell) आयपीसीच्या कलम ५०९, २९४बी आणि आयटी कायद्याच्या
कलम ६७ नुसार गुन्हा दाखल केला. पुणे पोलिसांनी स्पष्ट केले की ते बनावट खाते होते.
व्हिडिओमध्ये आरोपीची कोणतीही भूमिका नव्हती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PCMC News | मंगळसूत्र विकून, सोने गहाण ठेऊन पूर रेषेतील बांधकामांसाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप

Ravindra Dhangekar On Ajit Pawar | पोर्शे कार अपघातावरून धंगेकरांचा अजितदादांवर निशाणा, ”त्यांची भाषा सैल झालीय, फडणवीसांनी हातपाय बांधून खुर्चीत ठेवलंय” (Video)

Porsche Car Accident Pune | सुरेंद्रकुमार अग्रवालने ड्रायव्हरला खोलीत डांबले; ड्रायव्हरच्या बायकोने आरडाओरडा केल्यानंतर सुटका (Videos)