Pune Railway News | सुट्टीच्या काळात रेल्वेचा मोठा ब्लॉक ! पुण्यातून सुटणाऱ्या ‘या’ गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Railway News | जळगाव (Jalgaon) भुसावळ विभागात (Bhusawal Division) रेल्वेचा तिसरा मार्ग आणि यार्ड रिमॉडलिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान रेल्वेकडून ब्लॉक (Railway Block) घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे विभागातून (Pune Railway News) सुटणाऱ्या 9 गाड्या रद्द (Train Canceled) करण्यात आल्या आहेत. तर 10 गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. सुट्टीच्या काळात रेल्वेने मोठा ब्लॉक घेतल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

रद्द केलेल्या गाड्या (Pune Railway News)

  • 12 व 14 ऑगस्ट रोजी सुटणारी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द (Kolhapur-Gondia Maharashtra Express)
  • 13 ऑगस्ट रोजी सुटणारी नागपूर- पुणे एक्सप्रेस (Nagpur-Pune Express), जबलपूर-पुणे (Jabalpur-Pune) रद्द.
  • 14 ऑगस्ट रोजी सुटणारी पुणे-नागपूर, पुणे-जबलपूर, नागपूर-पुणे, गोंदिया-कोल्हापूर रद्द.
  • 15 ऑगस्ट रोजी सुटणारी पुणे-नागपूर एक्स्प्रेस रद्द .
  • 16 ऑगस्टला सुटणारी गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसही रद्द

मार्गात बदल केलेल्या गाड्या

  • 13 ऑगस्ट रोजी सुटणारी गाडी दानापूर-पुणे एक्सप्रेस (Danapur-Pune Express), जसीडीह-पुणे एक्सप्रेस (Jasidih-Pune Express), हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस (Azad Hind Express)जळगाव- वसई रोड – लोणावळा या मार्गे धावेल.
  • 13 ऑगस्ट रोजी सुटणारी जम्मूतवी – पुणे झेलम एक्सप्रेस (Jammu Tawi – Pune Jhelum Express) जळगाव- वसई रोड-कल्याण-लोणावळा या मार्गे धावेल.
  • 14 ऑगस्ट रोजी सुटणारी पुणे -हावडा (Pune–Howrah), पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस लोणावळा-पनवेल-वसई रोड-उधना-जळगाव या मार्गाने धावेल.
  • 14 ऑगस्ट रोजी सुटणारी पुणे – जम्मूतावी झेलम एक्सप्रेस, पुणे – दानापूर एक्सप्रेस, वास्को हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस (Vasco Hazrat Nizamuddin Goa Express) लोणावळा-वसई रोड- उधना-जळगाव या मार्गाने धावेल.
  • 14 ऑगस्ट रोजी निघणारी हजरत निजामुद्दीन – म्हैसूर एक्स्प्रेस (Hazrat Nizamuddin – Mysore Express) इटारसी-नागपूर-बल्लारशा या मार्गे धावेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Research on Social Media | मेंदूवर सोशल मीडियाचा निगेटिव्ह प्रभाव पडतो की नाही? लेटेस्ट रिसर्चचा दावा आश्चर्यचकित करेल तुम्हाला

Hair Loss | पुरुषांचे अकाली पडतेय टक्कल, हेयरफॉलची ‘ही’ 5 कारणं, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला, केसगळतीला लागेल ब्रेक