Pune Railway Station | पुणे रेल्वे स्थानकावरील धक्कादायक घटना, मनोरुग्ण थेट पुणे रेल्वे स्थानकाच्या एफओबीवर चढला (Videos)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Railway Station | पुणे रेल्वे स्थानकावर आज (गुरुवार) सकाळी धक्कादायक घटना घडली आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या एफओबीवर (फुट ओव्हर ब्रिज, पादचारी पूल) मनोरुग्ण चढला. हा प्रकार प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काल रेल्वे कर्मचाऱ्यांना या संदर्भात माहिती दिली. त्यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ हालचाली केल्या आणि त्यांनी एफओबीवर चढून त्या मनोरुग्ण व्यक्तीला उचलून खाली आणलं. त्यावेळी रेल्वे स्थानकावर काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

गुरुवारी सकाळी ही घटना घडली. चढलेला मनोरुग्ण हा खाली उतरणार नाही म्हणत हट्टाला पेटला. त्याला कर्मचाऱ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तो ऐकण्याच्या तयारीत नव्हता. यावेळी एफओबीवर फार वेळ थांबण आणि मनोरुग्णाने उडी मारण्याचा प्रयत्न केला असता तर मोठा धोका निर्माण झाला असता. या सगळ्या शक्यता पाहून रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला पुन्हा समजण्याचा प्रयत्न केला. परंतु तो हट्टाला पेटल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी त्याला उचलून खाली घेऊन आले. यावेळी त्याने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत लोहमार्ग पोलीस अधिकाऱ्यांनी (Lohmarg Police Pune) सांगितले, या व्यक्तीला आमच्या कर्मचाऱ्यांकडून खाली उतरवण्यात आले असून, त्याची सखोल विचारपूस करण्यात येत आहे. या व्यक्तीकडून खाली उतरण्यास टाळाटाल करण्यात येत होती. त्याची चौकशी सुरु आहे, परंतु तो उडवा उडवीची उत्तरे देत आहे. (Pune Railway Station)

पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे व्हाट्सअप ग्रुप वरून अशी माहिती मिळाली की एक मनोरुग्ण इसम छत्री गेटवरील पत्रे वरती चढलेला आहे.
डी बी टीमने शर्तीचे प्रयत्न करून ब्रिजवरील पत्र्यावर चढून खाली उतरवून घेतले.
त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव संजय कुमार दरोगी शर्मा (वय 28 वर्षे धंदा-सेंटरिंग राहणार – मुखिया कटियाल बिहार) असे सांगितले त्याला पत्र्यावर जाण्याचे कारण विचारले असता तो काही एक व्यवस्थित उत्तर देत नाही.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड (PI Rajendra Gaikwad)
यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनिल कदम, पोलीस हवालदार आनंद कांबळे,
अनिल टेके, पोलीस नाईक निलेश बिडकर, पोलीस शिपाई विकम मधे,
पोलीस शिपाई नेमाजी केंद्रे यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ujani Dam Backwater Boat Accident | उजनी जलाशय बोट दुर्घटनेतील बेपत्ता 6 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले, कुटुंबियांचा आक्रोश

Pune Crime Branch | पुणे : गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला अटक, दोन पिस्टल व चार राऊंड जप्त