Pune Rape Case | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, समर्थ पोलिसांकडून आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rape Case | तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवले (Lure Of Marriage). तसेच तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवून लग्नास नाकार देऊन फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी (Samarth Police) एकाला अटक केली आहे. हा प्रकार डिसेंबर 2018 ते मार्च 2024 या कालावधीत नाना पेठेतील (Nana Peth Pune) एका हॉटेलमध्ये घडला आहे.

याबाबत हडपसर येथे राहणाऱ्या 30 वर्षीय तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन गजानन जगन्नाथ भवर Gajanan Jagannath Bhavar (वय-33 रा. तळवडे, पुणे) याच्यावर आयपीसी 376/2/एन नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी यांची 2018 मध्ये ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर तरुणीला नाना पेठेतील एका हॉटेलमध्ये नेले. त्याठिकाणी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तो वारंवार तरुणीचे लैंगिक शोषण (Sexual Exploitation) करीत होता. (Pune Rape Case)

तरुणीने गजानन भवर याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली.
मात्र, त्याने टाळाटाळ करुन लग्न करण्यास नकार दिला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने शनिवारी (दि.13) समर्थ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी भवर याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास समर्थ पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त