Pune : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विलास गिते यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   नाना पेठेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक विलास सदाशिव गिते (वय 69 ) यांचे मंगळवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले..त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगा असा परिवार आहे. समस्त हिंदू आघाडीचे प्रवक्ते प्रितम गिते यांचे ते वडील होते.

गिते यांनी पूर्व पुण्यामध्ये गेली 55 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य रुजवले होते. गिते सर म्हणून ते परिचित होते. आणीबाणी मध्ये मिसा कायद्यान्वये त्यांना तुरुंगवासही झाला होता.

You might also like