Pune RDC Jyoti Kadam | नेहरू युवा केंद्राच्या उपक्रमास प्रशासनाचे पूर्ण सहकार्य – निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती कदम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune RDC Jyoti Kadam | नेहरू युवा केंद्राच्या उपक्रमास (Nehru Yuva Kendra Sangathan) जिल्हा प्रशासनाचे सर्व सहकार्य राहील, असे प्रतिपादन निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती कदम (Pune RDC Jyoti Kadam) यांनी केले.

नेहरु युवा केंद्र पूणे यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात (Pune Collector Office) आयोजित जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू (Shalini Dhote Kadu), नेहरू युवा केंद्राचे विभागीय संचालक कार्तिकेयन (Karthikeyan), नेहरू युवा केंद्राचे उपनिदेशक तथा जिल्हा सल्लागार समितीचे सचिव यशवंत मानखेडकर (Yashwant Mankhedkar), राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेच्या डॉ. संपदा बांगर (Dr. Sampada Dipak Bangar) आदी उपस्थित होते. (Pune RDC Jyoti Kadam)

श्रीमती कदम म्हणाल्या, नवीन सल्लागार समितीच्या सर्वच सदस्यांनी युवक-युवतींना आपल्या उपक्रमात
मोठ्या संख्येने सहभाग करून घ्यावे. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून शासकीय, निम शासकीय योजनांची
मोहिती ग्रामीण स्तरावर पोहोचवून नागरिकांना योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत.
१४ जून रोजी डेक्कन कॉलेज येथे आयोजित करण्यात येणाऱ्या युवा उत्सवाचा आराखडा तयार करून चांगले
नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मानखेडकर यांनी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.
आमची माती आमचा देश, कॅच द रेन फेस ३, जिल्हास्तरीय युवा उत्सव, पर्यावरण बदल, क्षय रोग निर्मूलन,
वृक्ष लागवड, या मोहिमअंतर्गत युवकांचा जास्तीत जास्त सहभाग करून घ्यावा आणि मोहिमा यशस्वी कराव्या,
अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

श्रीमती कडू म्हणाल्या, नेहरू युवा केंद्राच्या उपक्रमात महिलांचा ५० टक्के सहभाग असावा. त्यासाठी प्रयत्न करावेत. देशात २०२५ पर्यंत क्षयरोगाला पूर्णपणे नष्ट करायचे आहे. त्यादृष्टीने क्षय रोग निर्मूलन चळवळीत युवकांची मदत आवश्यक आहे, असे श्रीमती बांगर यांनी सांगितले.

बैठकीत आमची माती आमचा देश कार्यक्रम, १४ जून रोजी आयोजीत जिल्हास्तरीय युवा उत्सव तयारी,
कॅच द रेन फेज ३ अंतर्गत भूजल पातळीत वाढ करण्यासाठी अभियान कार्यक्रम, तालुका प्रतिनिधि,
राष्ट्रीय युवा स्वयंसेवक निवड इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.

Web Title :  Pune RDC Jyoti Kadam | Administration’s full support to Nehru Yuva Kendra initiative – Resident Deputy Collector Jyoti Kadam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanskruti Balgude | मला वाटलं माझ्यावर ॲसिड अटॅक वगैरे होतो की काय…? अभिनेत्री संस्कृती बालगुडेनी सांगितला ‘तो’ किस्सा

Pune ACB Trap Case | वाघोली येथील तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणार्‍या दोघांना अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक, 50 हजाराच्या लाचेची मागणी

Railway Underpass In Khadki Pune | खडकी येथील रेल्वे अंडरपासचे होणार रुंदीकरण पुणे महापालिका देणार 25 कोटी रुपये

Pune Katraj Vikas Aghadi | कात्रजकरांच्या समस्या मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकार्‍यांसमवेत 8 जून रोजी कात्रज विकास आघाडीच्यावतीने जनता दरबाराचे आयोजन

NCP MLA Rohit Pawar | शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका होत असताना दिग्गज नेते गप्प का?, रोहित पवारांचा स्वपक्षीयांना सवाल