Pune Rickshaw Strike | राज ठाकरेंच्या भेटीनंतर पुण्यातील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आपापसात भिडले

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – शहरात सुरू झालेल्या बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा चालकांनी 28 नोव्हेंबर रोजी संप (Pune Rickshaw Strike) पुकारला होता. रिक्षा चालकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन आरटीओ कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर आंदोलन करणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. भेट झाल्यानंतर या संघटनांच्या (Pune Rickshaw Strike) पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे.

 

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर हॉटेल राजमहलबाहेर रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आपापसात भिडले. ‘महाराष्ट्र रिक्षा पंचायत’चे बाबा कांबळे आणि ‘बघतोय रिक्षावाला संघटने’चे केशव क्षीरसागर यांच्यात बाचाबाची झाली. राज ठाकरेंसमोर बोलण्याची संधी न दिल्याने बाबा कांबळे यांनी संताप व्यक्त केला. रिक्षाचालकांची भूमिका मांडायची त्यांची इच्छा होती. पण केशव क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर हा शाब्दिक वाद आणखीनच पेटला. पण, तिथे उपस्थित इतर पदाधिकाऱ्यांनी हा वाद शांत केला.

 

तत्पूर्वी, सर्व रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना त्यांचे प्रश्न ऐकवले,
‘बाइक टॅक्सीमुळे आमचं जगणं मुश्किल झाले आहे. तुम्ही आजपर्यंत अनेकांचे प्रश्न सोडविले आहेत.
तुमचा शब्द कोणी टाळत नाही. आमचा प्रश्न तुम्ही मार्गी लावावा,’ अशी मागणी त्यांनी राज ठाकरेंकडे केली.
तर यासंबंधी उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, ‘मी या संदर्भात संबंधितांसोबत बोलतो आणि तुम्हाला कळवतो.
आज संध्याकाळपर्यंत कोणाशी तरी नक्की बोलणं होईल.’

 

Web Title :- Pune Rickshaw Strike | rickshaw unions came face to face after meeting with mns raj thackeray in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Prathamesh Parab | प्रथमेश परबच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या ‘त्या’ मैत्रिणीने केलेली पोस्ट चर्चेत

Riteish Deshmukh Ved | ‘वेड’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट 30 डिसेंबर रोजी होणार प्रदर्शित

Pune Rickshaw Strike | ‘बोल बच्चन अधिकारी’ म्हणत संतप्त रिक्षा चालकांचे RTO अधिकाऱ्यांना साष्टांग दंडवत