Pune River Rejuvenation Project | मुळा- मुठा नदी सुधार प्रकल्प ! बंडगार्डन ते मुंढवा दरम्यानच्या पीपीपी तत्वावरील ६५० कोटी रुपयांच्या कामासाठी 2 कंपन्यांच्या निविदा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune River Rejuvenation Project | मुळा- मुठा नदी काठसुधार (Mula Mutha Riverfront Development) योजनेमध्ये पीपीपी Purchasing Power Parity (PPP) तत्वावर करण्यात येणार्‍या दुसर्‍या टप्प्यातील बंडगार्डन ते मुंढवा (Bundgarden To Mundhwa) दरम्यानच्या सुमारे ६५० कोटी रुपयांच्या कामांसाठी २ निविदा आल्या आहेत. तांत्रिक तपासणीनंतर येत्या एकदोन दिवसांत या निविदा उघडण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेतील (Pune Corporation) अधिकार्‍यांनी दिली. (Pune River Rejuvenation Project)

 

मुळा- मुठा नदी काठ सुधार योजनेत (Mula Mutha River Development Project) नदीच्या ४४ कि.मी. च्या काठांचा विकास करण्यात येणार आहे. पर्यावरणीयदृष्टया नदी पुनरूज्जीवनासोबतच (Pune River Rejuvenation Project) नागरिकांना नदीकडे आकर्षित करण्यासाठी प्रामुख्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ११ टप्प्यात राबविण्यात येणार्‍या या प्रकल्पासाठी ४ हजार ७०० कोटी रुपये खर्च आहे. यापैकी पहिला टप्प्याचे सुमारे ३०० कोटी रुपयांचे संगमवाडी ते बंडगार्डन पुला दरम्यानच्या कामाची निविदा यापुर्वीच मंजूर झाली आहे. तर दुसर्‍या टप्प्यातील बंडगार्डन ते मुंढवा दरम्यानच्या कामाची निविदा उघडण्यात आली आहे. पीपीपी तत्वावर क्रेडीट नोटच्या माध्यमातून होणार्‍या या टप्प्यातील कामासाठी दोनच निविदा आल्या आहेत. यापैकी एक निविदा जे.कुमार इन्फ्रापोजेक्टस लि.या (J Kumar Infraprojects Ltd) कंपनीची असून दुसरी निविदा एन.सी.सी. लिमिटेड (NCC Limited) या कंपनीची आहे. या दोन्ही निविदांची तांत्रिक तपासणी झाल्यानंतर एक-दोन दिवसांत निविदा उघडण्यात येईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

 

बंडगार्डन ते मुंढवा दरम्यानच्या निविदेला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आल्यानंतरही केवळ दोनच कंपन्यांनी सहभाग नोंदविला आहे.
याउलट महापालिकेच्या निधीतून (PMC Funds) होणार्‍या संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यानच्या कामाच्या निविदा प्रक्रियेत (Tender Process)
पाच कंपन्यां सहभागी झाल्या होत्या. यामध्ये बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा.लि. या (B.G. Shirke Construction Technology Pvt.)
कंपनीची निविदा बिलो १३.१४ टक्के इतकी सर्वात कमी होती.
विशेष असे की याच टप्प्यासाठी जे.कुमार इन्फ्रापोजेक्टस या कंपनीने १.९८ टक्के अधिक दर दिला होता.
तर एन.सी.सी. लिमिटेड ने १२ टक्के अधिक दराने निविदा भरली होती.

 

Web Title :- Pune River Rejuvenation Project | Mula Mutha Riverfront Development project! Tenders from 2 companies for Rs 650 crore work on PPP basis between Bundgarden and Mundhwa

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा, म्हणाले – ‘भगव्या झेंड्याच्या रक्षणाची जबाबदारी आता आपली’

 

Pune Municipal Corporation (PMC) | स्थायी समितीच्या मुदत संपलेल्या 8 जागांवर नवीन नियुक्त्या

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 54 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी