Pune Sahakar Nagar Police | झोमॅटोची डिलीव्हरी करणार्‍या पिता-पुत्रास लुटणार्‍या तिघांना सहकारनगर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -Pune Sahakar Nagar Police | झोमॅटोची डिलीव्हरी करणार्‍या पिता-पुत्रास रात्रीच्यावेळी मारहाण करून लुटणार्‍या दरोडयाच्या गुन्हयातील तिघांना सहकारनगर पोलिसांनी गुन्हा घडल्यापासुन अवघ्या 48 तासाच्या आतमध्ये अटक केली आहे. (Pune Sahakar Nagar Police)

शंतनु मारूती लोहार (18, रा. दुर्वांकुर सोसायटी, प्रभात चौक, धनकवडी, पुणे), मंगेश उर्फ मंग्या हनुमंत चौरे (21, रा. नवनाथ नगर, बालाजी किराना दुकानाजवळ, तापकीर यांची बिल्डींग, धनकवडी) आणि अविष्कार उर्फ अव्या अशोक दिघे (22, रा. गुलाबनगर, धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, ओंकार हनुमंत कुंभारी (22, रा. धनकवडी) हे त्यांच्या वडिलांसह झोमॅटो कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणुन नोकरी करतात. दि. 9 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता ओंकार हे त्यांच्या वडिलांसह धनकवडी येथील नवनाथनगर येथे बर्गरची डिलीव्हरी करण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपींना त्यांना तंबाखु मागण्याचा बहाणा केला. त्यांनी लाईटच्या टयुबने त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल चोरी करून नेला. दि. 10 रोजी ओंकार यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सी.बी. बेरड, तपास
पथकातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापु खुटवड आणि पोलिस अंमलदार महेश मंलीक व सागर कुंभार हे आरोपींचा माग काढत होते. त्यावेळी त्यांना आरोपींनी हा गुन्हा केला असून ते कात्रजकडून नवले पुलाकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचुन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली.

पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेली वाहने आणि ओंकारचा मोबाईल असा एकुण 1 लाख 17 हजार रूपयाचा
ऐवज जप्त केला आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश नलावडे करीत आहेत.

अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील, डीसीपी स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त नंदीनी वग्यानी,
वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सी.बी. बेरड, एएसआय बापु खुटवड,
पोलिस हवा. बजरंग पवार, संजय गायकवाड, अमोल पवार, निलेश शिवतरे, पोलिस अंमलदार महेश मंडलीक, नवनाथ शिंदे,
सागर कुंभार, सागर सुतकर आणि विशाल वाघ यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये सामंजस्य करार ! शालेय सुविधांसाठी ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ची 3 कोटींची मदत

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | गणेशजयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम’ ! ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून आयोजन’

Nashik Crime News | किरकोळ वादातून लोखंडी रॉडने हल्ला करुन रिक्षाचालकाचा खून

पिंपरी : खोटी बिले देऊन कंपनीला 24 लाखांचा गंडा, दोन कर्मचाऱ्यांवर FIR

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या विद्यार्थ्यांना 31 संगणकांची भेट

Pune Lonikand Crime | भावजयीचा भावाच्या मदतीने खून करणार्‍यास लोणीकंद पोलिसांकडून अटक

Muder In Budhwar Peth Pune | बुधवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजजवळ महिलेचा खून

Pune Mundhwa Police | ‘इमानदार’ रिक्षा चालकाने पोलिस ठाण्यात जमा केला 1 लाख 10 हजाराचा ऐवज; मुंढवा पोलिसांकडून रिक्षा चालकाचे कौतुक अन् सत्कार