Pune News : आगीतील मृतांच्या कुटुंबियांना ‘सिरम’ देणार प्रत्येकी 25 लाख रूपये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्याच्यासीरम इन्स्टिट्यूटमध्ये आज (गुरुवार) आग लागली. BCG लस बनवण्याच्या इमारतीला ही आग लागली. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी ही लगली. या दुर्घटनेत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या प्रत्येकाच्या नातेवाईकांना सीरम इन्स्टिट्यूट कडून प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थीक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सायरस एस. पूनावाला यांनी केली आहे.

आज दुपारी सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी भागातील नवीन प्लांटमध्ये आग लागली. या आगीमध्ये पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये पुण्यातील दोन, उत्तर प्रदेशातील दोन आणि बिहार येथील एकाचा मृत्यू झाला. प्रतिक पाष्टे (डेक्कन पुणे), महेंद्र इंगळे (पुणे), रमाशंकर हरिजन (उत्तर प्रदेश), बिपीन सरोज (उत्तर प्रदेश), सुशीलकुमार पांडे (बिहार) असे मृत्यू झालेल्याची नावे आहेत.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांची मदत करण्याचे जाहीर केले आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासाठी अत्यंत दु:खद दिवस आहे. मांजरी येथील आमच्या कंपनीला लागलेल्या आगीमध्ये खूप मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबीयांबद्दल आम्ही दु:ख व्यक्त करतो. मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत करत आहोत. या कठीण प्रसंगी प्रत्येकाने प्रार्थना केली त्याबद्दल आम्ही त्या सर्वांचे आभारी आहोत.