Pune Shivsena News – Lok Sabha | शिवसेनेने फुकंले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग…मिशन ४८ साठी कसली कंबर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या शिवसंकल्प अभियानाच्या झंझावाती दौऱ्याला होणार सुरूवात !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Shivsena News – Lok Sabha | राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कामांच्या बळावर आपल्याला मतं मागायची असून मिशन ४८ ची सुरूवात करण्यासाठी शिवसंकल्प अभियान हाती घेतले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेऊन लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. या शिवसंकल्प अभियान दौऱ्याची सुरुवात शिरूर व मावळ लोकसभेपासून करण्यात येणार असून, येत्या ०६ जानेवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा संपन्न होणार आहे. (Pune Shivsena News – Lok Sabha)

याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शहरातील पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यातील शिवसेनेचे प्रमुखपदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी व अंगिकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. (Pune Shivsena News – Lok Sabha)

यावेळी, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसैनिकांना मोठी ताकद मिळाली असून, भविष्यात या ताकदीचा वापर करून, एकनाथ शिंदे साहेबांचे व शिवसेनेचे काम तळागाळापर्यंत पोहचवा असे सांगितले. याचसोबत येत्या ६ जानेवारीला शिरूर व मावळ लोकसभेमध्ये होणाऱ्या शिवसंकल्प अभियानाला प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

तसेच, शिवसेना पुणे जिल्ह्याचे लोकसभा निरीक्षक किशोर भोसले यांनी पक्षातील शिवदूत, बुथप्रमुख इथपासून ते शहरप्रमुखांपर्यंत नव्या जोमाने कामाला लागून, पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी आणि नव्या उमेदीने पक्ष बांधणी करून, पक्ष वाढीस हातभार लावूयात असे सांगितले आहे.

दरम्यान, शिवसंकल्प अभियानाचे प्रचार मेळावे दोन टप्प्यात पार पडणार असून त्यातील पहिला टप्पा
६ जानेवारी रोजी शिरूर येथुन सुरू होणार असून ११ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर
येथील सभेने पहिल्या टप्प्यातील प्रचारदौरा पूर्ण होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात २५ जानेवारीपासून पुन्हा प्रचार मेळाव्याना पुन्हा सुरूवात होणार असून २५ जानेवारी रोजी शिर्डी येथे दुसरा प्रचार मेळावा पार पडेल, तर या प्रचार मेळाव्यांचा समारोप ३० जानेवारी रोजी हातकणंगले येथे होईल.

या प्रचार मेळाव्यांच्या समारोपासह पक्षाच्या वतीने कोल्हापूर येथे दोन दिवसीय विशेष महाशिबिराचे आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर या शिवसंकल्प अभियानाची सांगता होणार आहे.

या शिवसंकल्प अभियान पूर्व नियोजित आढावा बैठकीत, राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार शिवसैनिक, तथा सर्व पदाधिकऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, या बैठकीला शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, पुणे लोकसभा निरीक्षक किशोर भोसले,
जिल्हाप्रमुख रमेश बाप्पू कोंडे, उल्हासभाऊ तुपे, युवासेना सचिव किरण साळी, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे,
निलेश गिरमे, युवासेना सहसंपर्क प्रमुख अविनाश खेडेकर,
महिला आघाडी शहर प्रमुख पुजाताई रावेतकर, माथाडी कामगार सेना जिल्हाप्रमुख निलेश माझीरे,
शहर संघटक श्रीकांत पुजारी, शहर समन्वयक शंकर संगम, नवनाथ निवंगुणे, राजाभाऊ भिलारे,
धनंजय जाधव, प्रमोद प्रभुणे, शिवसेना पुणे प्रवक्ते अभिजित बोराटे, लक्ष्मण आरडे,
उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर, सुनील जाधव, गौरव साईनकर, संजय डोंगरे, सचिन थोरात,
महिला उपशहर प्रमुख श्रद्धा शिंदे, श्रुती नाझिरकर, चैत्राली गुरव, ओबीसी शहर अध्यक्ष मकरंद केदारी
व शिवसेना, युवासेना सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, अंगिकृत संघटना व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IPS officer Rashmi Shukla | रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती,
पहिल्या महिला पोलीस महासंचालक

Pune Municipal Corporation (PMC) | अनधिकृत बांधकाम करणाऱ्या ‘त्या’ 11 जणांवर गुन्हा दाखल करा,
पुणे मनपाचे भारती विद्यापीठ पोलिसांना पत्र

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांकडून
अटक, पिस्टल व काडतूस जप्त