Pune Shivsena News | पुण्यातील काही पब बेकायदेशीर ! रात्री 10 नंतर अनेक ठिकाणी ओपन टेरेस पब अन् हॉटेलमध्ये ऑर्केस्ट्रा अन् डीजे, कारवाईसाठी शहर शिवसेनेकडून पोलिस आयुक्तांना निवेदन

पुणे : Pune Shivsena News | पुणे शहर शिवसेनेच्या वतीने पुण्याच्या विविध प्रश्नांसंदर्भात पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar) यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire), सह संपर्क प्रमुख अजय भोसले (Ajay Bhosale), युवती सेनेच्या शर्मिला येवले (Sharmila Yewale), प्रसिद्धी प्रमुख संजय अग्रवाल (Sanjay Agarwal) आदी पदाधिकारी उपस्थित होते. (Pune Shivsena News)

पुणे शहरातील काही पब (Pubs In Pune), हॉटेल हे बेकायदेशीर चालत आहेत आणि अमली पदार्थाचे सेवन वाढले आहे. पुणे शहरात कॅम्प (Pune Camp), कोरेगाव पार्क (Koregaon Park) व जिथे महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज असणाऱ्या परिसरात रात्री 10 वाजता नंतर ओपन टेरेस पब आणि हॉटेलमध्ये ऑर्केस्ट्रा, डीजे वर गाणे लावून त्या गाण्यावर नाच गाणं चालत आहे. (Pune Shivsena News)

सुप्रीम कोर्टचे (Supreme Court) निदर्शनानुसार रात्री दहा नंतर व्यवसायिक व सार्वजनिक ठिकाणावर स्पीकर
व डीजे लावण्यावर बंदी असून तरी देखील पुण्यात ही परिस्थीत पाहायला मिळते.
तसेच गेल्या काही दिवसापासून पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होताना दिसत आहे.
त्या अवजड वाहतुकीमुळे शहरातील नागरिकांना विनाकारण त्रास होताना दिसून येतोय, छोट्या- मोठ्या अपघातांचे
प्रमाण वाढलेले आहे त्या संदर्भात वारंवार निवेदन देऊ देखील कुठलीही कारवाई वाहतूक विभागाकडून करण्यात येत नाही.

यासंदर्भात लवकरात लवकर ठोस पावले उचलावी आणि पुणे शहरात भरोसा सेलच्या अंतर्गत दामिनी पथक मागील काही वर्ष सक्रिय होते परंतु गेल्या काही दिवसांपासून दामिनी पथक सक्रिय नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
शाळा, विद्यालय,महाविद्यालय सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेस दामिनी पथकाची गस्त या महाविद्यालय, शाळा,
विद्यालयांच्या परिसरात असावी अश्या मागण्यांचे निवेदन पुणे शहर शिवसेनेच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त
यांना देण्यात आले असून यासंदर्भात लवकरात लवकर आढावा घ्यावा अशी मागणी पुणे पोलीस आयुक्तांना करण्यात
आले.

Web Title :- Pune Shivsena News | Some pubs in Pune are illegal! After 10 pm, open terrace pubs and orchestras and DJs in hotels in many places, city Shiv Sena to police commissioner for action

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Aam Aadmi Party (AAP) Letter To Chandrakant Patil | पुणे : आम आदमी पार्टीकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना खुले पत्र, ‘आप’ म्हणतंय – ‘दादा, पुण्यातील विक्रम – वेताळ खेळ थांबवा !’

MP Sanjay Raut | शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांची हकालपट्टी, ‘या’ ज्येष्ठ नेत्याची नेतेपदी निवड

Jalgaon ACB Trap | 5 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी तलाठयासह कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Congress Mohan Joshi | खा. राहुल गांधींविरुद्धचा निकाल म्हणजे भाजपच्या कपटी षडयंत्राचा भाग – मोहन जोशी