Pune Sinhagad Road Crime | पुणे : ब्लॅकमेल करुन अल्पवयीन मुलाला दागिने चोरी करायला लावले, सिंहगड पोलिसांकडून तरुणाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Sinhagad Road Crime | एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ब्लॅकमेल (Blackmail) करुन त्याला घरातील दागिने चोरण्यास भाग पाडले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) एका तरुणाला अटक केली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलाला 14 लाख 75 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरण्यास भाग पाडले. हा प्रकार नोव्हेंबर 2012 ते 25 फेब्रुवारी 2024 या कालावधीत धायरी येथे घडला आहे.(Pune Sinhagad Road Crime)

याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन निमितेश अतुल बुट्टे (वय-21 रा. चाकणकर हाऊसजवळ, गारमाळ, धायरी, पुणे) याच्यावर आयपीसी 384 सह पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 13 वर्षाच्या पुतण्याला क्लासला सोडण्यासाठी आरोपी निमितेश बुट्टे
याला ठेवले होते. आरोपीने फिर्यादी यांचा पुतण्या अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेतला.
त्याने अल्पवयीन मुलाला तु वेप सिगारेट ओढतोस व अश्लील व्हिडिओ पाहतोस हे घरी सांगण्याची धमकी दिली.
घाबरलेल्या मुलाने आरोपीने सांगितल्या प्रमाणे वेळोवेळी फिर्यादी यांचा भाऊ सचिन याच्या घरातील सोन्याचे दागिने व
रोख रक्कम चोरून आरोपीकडे दिले. आरोपीने फिर्यादी यांच्या पुतण्याच्या अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pradeep Sharma | लखन भैया बनावट एन्काऊंटर प्रकरणी प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा

Pimpri Dighi Crime | पिंपरी : दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक, पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Kothrud Crime | ज्यूस विक्रेत्याला मारहाण, एकाला अटक, कोथरुड परिसरातील घटना