Pune Sinhagad Road Crime | पुणे : पाण्याच्या टँकरची दुचाकीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Sinhagad Road Crime | भरधाव वेगात जाणाऱ्या पाण्याच्या टँकरची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात टँकरचे मागील चाक अंगावरुन गेल्याने दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात नऱ्हे-धायरी रोडवरील (Narhe Dhayari Road Pune) नवले हॉस्पिटल जवळ असलेल्या डी-मार्ट आऊटलेटच्या समोर गुरुवारी (दि.11) दुपारी पावणे एकच्या सुमारास झाला. अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरुन पळून गेला आहे.(Pune Sinhagad Road Crime)

नयन आदेश मारणे (वय-20 रा. गांदले-मारणे हाईट्स, नऱ्हे-धायरी फाटा, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत नयनचे काका युवराज भिकाजी मारणे (वय-39 रा. नऱ्हे-धायरी फाटा, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाण्याचा टँकर क्रमांक एमएच 12 एफझेड 8916 वरील चालकावर आयपीसी 304(अ), 279 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवराज व त्यांचा पुतण्या नयन हे त्यांच्या अॅक्टिव्हा मोपेड (एमएच 12 व्हीके 8449) वरुन मोबाईल दुरुस्त करण्यासाठी नऱ्हे गावात जात होते. त्यावेळी नऱ्हे-धायरी रोडवर नवले हॉस्पिटल जवळ असलेल्या डी-मार्ट आउटलेट समोर फिर्यादी यांच्या दुचाकीला पाण्याच्या टँकरने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी यांच्या दुचाकीची धडक टँकरला बसल्याने ते व पुतण्या नयन दुचाकीसह खाली पडले.

पाण्याच्या टँकरचे डाव्या बाजूचे चाक अंगावरुन व गाडीवरुन गेले. यामध्ये युवराज व नयन हे गंभीर जखमी झाले.
नयन याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
घटनेनंतर टँकर चालक घटनास्थळावरुन पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव (API Rahul Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Yerawada Crime | पुणे : पाठलाग करुन अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, तरुणावर FIR

Baramati Lok Sabha Election 2024 | मोदींना ‘मनसे’ पाठिंबा, सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकावर राज ठाकरेंचा फोटो; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंना नोटीस, चुकीचा इतिहास आणि अयोग्य धार्मिक माहिती जनमानसात पसरवली, ”शाळकरी मुलांनाही समजते ते….”